Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंशुमन झिंगरन ठरला ‘ओशन्स सेव्हन’ पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू

anshuman jhingran first swimmer to swim oceans sevens: नवी मुंबईतील 21 वर्षीय जलतरणपटूने जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करत खुल्या समुद्रातील जलतरणातील 'ओशन्स सेव्हन' आव्हान पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो भारतातील केवळ तिसरा जलतरणपटू आणि जगातील सर्वात तरुण पुरुष ठरला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 08, 2026 | 04:37 PM
अंशुमन झिंगरन ठरला ‘ओशन्स सेव्हन’ पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू
Follow Us
Follow Us:
  • अंशुमन झिंगरन ‘ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा जलतरणपटू
  • जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी यशस्वीरित्या केली पार
  • सात सामुद्रधुनी… तीन वर्षे… एक विलक्षण प्रवास
नवी मुंबई: अंशुमन झिंगरन याने जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी (Tsugaru Channel) यशस्वीरित्या पार करत जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘ओशन्स सेव्हन’ (Ocean’s Seven) हे आव्हान पूर्ण केले आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू असून, भारतातील केवळ तिसरा जलतरणपटू ठरला आहे. 30 जून 2026 रोजी अंशुमनने जपानमधील गोंगेन्झाकी (Gongenzaki) ते फुकुशिमा (Fukushima) असा त्सुगारू सामुद्रधुनीचा प्रवास अधिकृतपणे 12 तास, 39 मिनिटे आणि 29 सेकंदांत पूर्ण केला. या पोहण्याला त्सुगारू स्ट्रेट स्विमिंग फेडरेशन (Tsugaru Strait Swimming Federation) यांनी अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे. होंशू आणि होक्काइडो बेटांदरम्यानची सुमारे 19.5 किलोमीटर लांबीची ही सामुद्रधुनी तीव्र भोवरे, सतत बदलणारे समुद्री प्रवाह आणि अत्यंत अनिश्चित हवामानासाठी ओळखली जाते. ‘ओशन्स सेव्हन’मधील हा आशियाई टप्पा मानला जातो.

वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी, अंशुमनने जगातील सातही प्रतिष्ठित समुद्री सामुद्रधुनींचे पोहण्याचे आव्हान पूर्ण करून इतिहास रचला आहे. याआधी हा विक्रम नवी मुंबईच्याच प्रभात कोळी यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी ‘ओशन्स सेव्हन’ पूर्ण केले होते. अंशुमन आता रोहन मोरे आणि प्रभात कोळी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा भारतातील तिसरा जलतरणपटू ठरला असून, भारताच्या खुल्या समुद्रातील जलतरण क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याची ही अभिमानास्पद नोंद आहे.

Switzerland beat Colombia: ७२ वर्षांनंतर स्वित्झर्लंडची ऐतिहासिक झेप; पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा पराभव

सात सामुद्रधुनी… तीन वर्षे… एक विलक्षण प्रवास

अंशुमनने अवघ्या तीन वर्षांत ‘ओशन्स सेव्हन’मधील सातही आव्हाने पूर्ण केली. त्याच्या या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात 17 जुलै 2023 रोजी नॉर्थ चॅनेल (उत्तरी आयर्लंड ते स्कॉटलंड) येथून झाली. त्याने हा प्रवास 11 तास 28 मिनिटांत पूर्ण करत वयाच्या 18 वर्षे 125 दिवसांत हा पराक्रम करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू बनला. या कामगिरीला Irish Long Distance Swimming Association यांनी प्रमाणित केले असून Guinness World Records मध्ये त्याची नोंद करण्यात आली.

याच्या अवघ्या सहा आठवड्यांनंतर, 30 ऑगस्ट 2023 रोजी त्याने अमेरिकेतील कॅटालिना चॅनेल (मुख्य भूमी ते कॅटालिना बेट) 8 तास 38 मिनिटांत पार केली. या पोहण्याला Catalina Channel Swimming Federation यांचे प्रमाणपत्र मिळाले. 18 जानेवारी 2024 रोजी त्याने न्यूझीलंडमधील कूक स्ट्रेट अवघ्या 6 तास 58 मिनिटांत पार केली. या कामगिरीला New Zealand Open Water Swimming Federation यांचे प्रमाणन मिळाले. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2024 रोजी त्याने हवाईमधील अत्यंत कठीण समजली जाणारी मोलोकाई चॅनेल (मोलोकाई ते ओहू) 14 तास 21 मिनिटांत पूर्ण केली. या पोहण्याचे प्रमाणन Kaiwi Channel Association यांनी केले.

2025 हे वर्षही त्याच्यासाठी संस्मरणीय ठरले. 9 मे 2025 रोजी त्याने स्पेनमधील तारिफा बेट ते मोरोक्कोमधील सिरेस पॉइंट असा जिब्राल्टर सामुद्रधुनीचा प्रवास केवळ 3 तास 51 मिनिटांत पूर्ण केला. या कामगिरीला Strait of Gibraltar Swimming Association यांची मान्यता मिळाली. त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 रोजी त्याने जगप्रसिद्ध इंग्लिश चॅनेल (डोव्हर ते कॅले) 15 तास 49 मिनिटांत पार केली. या पोहण्याचे प्रमाणन Channel Swimming & Piloting Federation यांनी केले. आणि अखेर 30 जून 2026 रोजी जपानमधील त्सुगारू चॅनेल 12 तास 39 मिनिटे 29 सेकंदांत पार करून त्याने ‘ओशन्स सेव्हन’चा शेवटचा टप्पा पूर्ण केला. या कामगिरीला Tsugaru Strait Swimming Federation यांचे प्रमाणपत्र मिळाले असून तिची नोंद Guinness World Records कडेही पाठविण्यात आली आहे.

खुल्या समुद्रातील जलतरणातील ‘सेव्हन समिट्स’

‘ओशन्स सेव्हन’ला पर्वतारोहणातील ‘सेव्हन समिट्स’च्या समकक्ष मानले जाते. या सातही सामुद्रधुनींची वैशिष्ट्ये वेगवेगळी आणि अत्यंत आव्हानात्मक आहेत. नॉर्थ चॅनेलमधील गोठवणारे थंड पाणी आणि ‘लायन्स माने’ जेलीफिश, इंग्लिश व मोलोकाई चॅनेलमधील प्रदीर्घ अंतर, कूक स्ट्रेट आणि त्सुगारूमधील प्रचंड समुद्री प्रवाह—या सर्वांवर मात करण्यासाठी विलक्षण शारीरिक क्षमता, थंड पाण्याशी जुळवून घेण्याची ताकद आणि मानसिक खंबीरपणा आवश्यक असतो.

अथक मेहनत आणि जिद्दीचा परिपाक

ही ऐतिहासिक कामगिरी तीन वर्षांहून अधिक काळ केलेल्या कठोर प्रशिक्षण, अविरत मेहनत, शिस्त, खुल्या समुद्रातील हजारो तासांचा सराव आणि अटळ चिकाटी यांचे फलित आहे. नवी मुंबईचा रहिवासी असलेला अंशुमन वाशी येथील फ्र. अॅग्नेल स्पोर्ट्स सेंटरमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. भारतातील उबदार समुद्रात पोहण्याची सवय असलेल्या अंशुमनने जगातील सर्वात थंड सामुद्रधुनींसाठी स्वतःला तयार करण्यासाठी कठोर आइस-बाथ प्रशिक्षण घेतले तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धरमतर आणि रेवस ते गेटवे ऑफ इंडिया अशा लांब पल्ल्याच्या समुद्री सराव फेऱ्या पूर्ण केल्या.

भारतासाठी अभिमानाचा क्षण

अंशुमनची ही ऐतिहासिक कामगिरी केवळ त्याच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून, भारतासाठी आणि जागतिक खुल्या समुद्रातील जलतरण क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब आहे. त्याचा हा प्रवास जिद्द, चिकाटी आणि आपल्या स्वप्नांवर असलेल्या अढळ विश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारी उद्दिष्टेही गाठता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्याची ही कामगिरी देशातील नव्या पिढीतील जलतरणपटूंना आणि खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देईल.

अंशुमनने आपल्या या यशाचे श्रेय नेहमीच आपले प्रशिक्षक गोकुळ कामत, सातही देशांतील त्याच्या सहाय्यक पथकांना आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्याचे आई-वडील संदीप झिंगरन आणि किरण झिंगरन यांना दिले आहे. ]

अन्यायाची परिसीमा? टीम इंडियामध्ये Sanju Samson साठी दरवाजे बंद? गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ

Web Title: Anshuman jhingran completes oceans seven youngest indian swimmer tsugaru strait guinness world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Indian Ocean
  • Navi Mumbai
  • swimmer
  • Swimming

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद
2

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार
3

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

Sea Routes: रशियाचा Black Sea, तर होर्मुझ इराणचा; पाहा जगातील सर्वात महत्त्वाच्या 7 सागरी मार्गांवर कोणत्या महासत्तांचे नियंत्रण?
4

Sea Routes: रशियाचा Black Sea, तर होर्मुझ इराणचा; पाहा जगातील सर्वात महत्त्वाच्या 7 सागरी मार्गांवर कोणत्या महासत्तांचे नियंत्रण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.