Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suvendu Adhikari Cabinet: बाऊन्सर टाकणारा गोलंदाज विरोधकांना करणार ‘क्लिन बोल्ड’; बंगाल सरकारमध्ये घेतली मंत्रिपदाची शपथ

Ashok Dinda Takes Oath as Minister In Bengal Cabinet: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा यांनी पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 01, 2026 | 03:09 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • माजी गोलंदाज विरोधकांना करणार ‘क्लिन बोल्ड
  • बंगाल सरकारमध्ये घेतली मंत्रिपदाची शपथ
  • अशोक डिंडाची राजकीय इनिंग
पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा सोमवार १ जून रोजी पार पडला. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या उपस्थितीत राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण ३५ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या प्रमुख नावांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि मोयना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक डिंडा यांच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आता राजकारणाच्या मैदानात नवी इनिंग खेळताना दिसणार आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात डिंडा यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे क्रिकेटव विश्वातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.

RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज

बंगाल मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार करण्यात आला. कोलकाता येथील लोक भवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण ३५ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आर. एन. रवी यांनी आमदारांना मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. या विस्तारानंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या ४१ वर पोहोचली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात स्वपन दासगुप्ता, अर्जुन सिंग, तपस रॉय, शंकर घोष यांसारख्या प्रमुख नेत्यांनाही स्थान देण्यात आले.

अशोक डिंडाची राजकीय इनिंग

भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला अशोक डिंडा बंगाल क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव राहिले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघासाठी त्याने अनेक महत्त्वपूर्ण सामने जिंकून दिले होते. आयपीएलमध्येही त्याने अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर अशोक डिंडा यांनी २०२१ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मोयना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. २०२६ च्या निवडणुकीतही त्यांनी दमदार कामगिरी करत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चंदन मंडल यांचा १६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सलग दुसऱ्यांदा आमदार बनल्यानंतर आता त्यांना मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. माजी क्रिकेटपटू असल्याने, डिंडा यांना क्रीडा मंत्रालय मिळेल अशी क्रीडा चाहत्यांना आशा होती, पण हे खाते आधीच निशित प्रमाणिक यांना देण्यात आले आहे. सूत्रांनुसार, डिंडा यांना दुसरे एखादे महत्त्वाचे खाते किंवा युवकांशी संबंधित खाते दिले जाऊ शकते.

अशोक दिंडाची क्रिकेट कारकीर्द

अशोक डिंडाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले . उजव्या हाताचा वेगवान गोलंदाजाने भारतासाठी १३ एकदिवसीय आणि ९ टी-20 सामने खेळले. वनडेमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या, तर टी-20 क्रिकेटमध्ये १७ विकेट्स आपल्या नावावर केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही ७८ सामन्यात ६९ विकेट्स घेतले. या काळात त्याने कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांसारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले.

भारताचा डंका! सात्विक-चिरागची विजयी गर्जना; Singapore Open 2026 जिंकून रचला इतिहास

Web Title: Ashok dinda becomes minister west bengal cabinet expansion suvendu adhikari latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • BJP
  • Indian Athlete
  • indian cricket team
  • suvendu adhikari
  • Team India
  • West Bengal Assembly Elections 2026

संबंधित बातम्या

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
1

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
2

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
3

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
4

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.