Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup : क्रिकेटप्रेमींसाठी दु:खद बातमी; आशिया कपमध्ये खेळणार नाहीत ‘हे’ दोन भारतीय दिग्गज; ‘हे’ आलं कारण समोर… 

भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता तर आहेच सोबत आशिया कपचा विजेता सुद्धा आहे. आशिया कप स्पर्धेच्या पूर्वीच रोहित-विराटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 14, 2025 | 04:19 PM
Asia Cup: Sad news for cricket fans; 'These' two Indian legends will not play in the Asia Cup..

Asia Cup: Sad news for cricket fans; 'These' two Indian legends will not play in the Asia Cup..

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025 : भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला  आहे. भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता तर आहेच सोबत आशिया कपचा विजेता सुद्धा आहे. त्यामुळे अशावेळी भविष्यात ही लय राखणे टीम इंडियासाठी एक आव्हानच असणार आहे. आशिया चषक 2025 चे यजमानपद याच वर्षी भारताकडे असणार आहे. भारत गतवेळचा आशिया कपचा चॅम्पियन संघ राहील आहे. यावेळीही भारतीय संघ विजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणारा आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक गौतम गंभीरच्या टीम इंडियाने आतापासूनच तयारी करयाला सुरवात केली आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या पूर्वीच रोहित-विराटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू भारताकडून खेळताना दिसणार नसल्याची माहिती समोर येत आहे.  गेल्या वेळी आशिया चषक ट्रॉफी भारताच्या नावे करण्यात या दोन्ही खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अशा स्थितीत टीम इंडियामध्ये या दोन ज्येष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती ही चिंतेची बाब असणार  आहे. रोहित आणि विराट कोहली आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा भाग का असणार नाहीत? यामागील कारण नेमकं काय? याबबात जाणून घेऊया.

हेही वाचा : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? जाणून घ्या टॉप 5 फलंदाज

 नेमकं कारण काय?

आशिया चषक प्रथम एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आयोजित करण्यात येत होता. पण, गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आशिया चषकाचे स्वरूप बदलून T20 असे करण्यात आले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर  या दोन्ही खेळाडूंनी 2024 साली T20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यामुळेच विराट-रोहित आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाकडून खेळू शकणार नाहीत. यावेळी आशिया कप सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : होळीच्या आधी D Gukesh पोहोचला तिरुपती बालाजीला, वर्ल्ड चेस चॅम्पियनने केले मुंडण, Video Viral

संघाची धुरा तरुणांच्या खांद्यावर..

यंदाच्या आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असणार आहे. कर्णधारपदाबाबत सूर्यकुमारची कामगिरी  खूप चांगली राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळवल्या गेलेल्या एकही द्विपक्षीय मालिका त्याने गमावलेली नाही. कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच बहुराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. या संघात सूर्यकुमार व्यतिरिक्त अनेक युवा खेळाडूंचा भरणा असणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचेही संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसतील. गोलंदाजीची मुख्य जबाबदारी अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. तसेच दुसरीकडे, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई सारखे खेळाडू देखील संघाचा भाग असण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Asia cup 2025 rohit sharma and virat kohli will not play in asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • Asia Cup
  • bcci
  • Captian Rohit Sharma
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • Suryakumar Yadav
  • virat kohali

संबंधित बातम्या

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
1

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
2

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
3

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.