पाकिस्तान वि यूएई(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan vs UAE : आशिया कपमध्ये आखेर आज पाकिस्तान संघ यूएईविरुद्ध मैदानात उतरणार आहे, आज स्पर्धेतील १० वा सामना यूएई आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी यूएई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. आजचा हा सामना एक तास विलंबाने म्हणजे रात्री ९ वाजता सुरू होणार आहे.
हेही वाचा : अरेरे! काय रे पाकिस्ताना? पुन्हा नाचक्कीच! जपानमध्ये जाण्यासाठी बनावट फुटबॉल संघ बनवला; विमानतळावर अटक
सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने या स्पर्धेतील पहिला सामना ओमानविरूद्ध जिंकला होता. या विजयाने पाकिस्तान संघाने विजयी सुरवात केली होती. परंतु, ओमान सारख्या नवख्या संघाने पाकिस्तानी फलंदाजांना चांगलेच रडवले होते. त्यामुळे पाकिस्तानला सांभाळून खेळावे लागणार आहे.
टॉसनंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा म्हणाला की, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. प्रथम फलंदाजी करून त्यांच्यावर दबाव आणायचा होता. एक परिपूर्ण खेळ खेळण्यासाठी आमच्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे.”
युएईचा कर्णधार वसीम म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आज हवामान असल्याने दव महत्त्वाची भूमिका बजावणार याहे. त्यांना कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हा करा किंवा मरोचा सामना आहे.”
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसमन म्हणाले की, ‘खेळपट्टी क्रमांक ३ वर मला वाटते की चेंडू चांगला येण्याची शक्यता नाही. वेळोवेळी हिरवा रंग दिसतो. संपूर्ण बाजूने गवताचे चांगले आच्छादन दिसून येत आहे. जर सीमरकडून सुरुवातीला योग्य कामगिरी करण्यात आली तर ते येथे काही नुकसान करू शकतात. तसेच फिरकी गोलंदाजांना जास्त वळण मिळण्याची शक्यता आहे असे मला वाटत नाही.
यूएई प्लेइंग इलेव्हन : अलिशान शराफू, मोहम्मद वसीम (कर्णधार), आसिफ खान, मोहम्मद जोहैब, हर्षित कौशिक, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), ध्रुव पराशर, हैदर अली, मोहम्मद रोहिद खान, सिमरनजीत सिंग, जुनैद सिद्दीकी.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.






