ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती (फोटो - ians)
ग्लेन मॅक्सवेलने आपल्या स्फोटक फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. वर्ल्डकपमध्ये अफगणिस्तानविरुद्ध त्याने दुखापत झालेली असताना केलेली खेळी त्याच्या कारकीर्दीतली सर्वात महत्वाची खेळी ठरली होती. त्यावलेस त्याने दुहेरी शतक ठोकत अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे.
ग्लेन मॅक्सवेल आपल्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असे. फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यामध्ये त्याने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी मॅक्सवेल ETPL या लीगमध्ये खेळताना दिसून आला होता. ग्लेन मॅक्सवेलने २०१२ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अफाट आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने अत्यंत कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मैदानाच्या कोणत्याही भागात मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे होती.
‘मी अजूनही तरुण आहे’, ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की नाही, स्पष्टच सांगितलं…
मॅन ऑफ दी मॅच ठरलेली आणि क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवली गेलेली २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील त्याची खेळी कधीही विसरता येणार नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या एका अतिशय कठीण सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला होता. तेव्हा स्नायूंच्या वेदना सहन करत करत देखील मॅक्सवेलने नॉट आउट 201 रन्सची खेळी केली होती. वनडे क्रिकेटमधील हाच त्याचा सर्वोच्च स्कोअर ठरला. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
आपली फिरकी गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिकणवून दिले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्याची उणीव कायमच भासणार आहे. त्यांने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने ऑस्ट्रेलिया संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वातून मॅक्सवेलला शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुढील भविष्यात मॅक्सवेल कोणत्या लीगमध्ये खेळताना दिसणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Ans: ग्लेन मॅक्सवेलने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2012 मध्ये डेब्यू केले होते.
Ans: स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 38 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे.






