इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) काल अंतिम सामना पार पडला. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सने (Kolkata Knight Riders) दमदार विजय मिळवून आयपीएल 2024 चा चॅम्पियन (IPL 2024 Champion) बनला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या विजेत्या संघाला बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये देण्यात आले आहेत. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंना तर बक्षीस दिलेच, त्याचबरोबर त्यांनी मैदानातील स्टाफ क्युरेटर्ससाठी खजिना खुला केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ग्राउंड स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
[read_also content=”घटस्फोटाच्या अफवांदरम्यान जाणून घ्या हार्दिक पांड्याची संपत्ती https://www.navarashtra.com/sports/know-hardik-pandyas-wealth-amid-divorce-rumours-who-is-natasa-stankovic-538768.html”]
सोशल मीडियावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पोस्टद्वारे ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्ससाठी मोठी घोषणा केली. जय शाहने X वर लिहिले, “आमच्या यशस्वी T-20 हंगामात (IPL 2024) अनसंग हिरोज ग्राउंड स्टाफचे महत्त्वाचे योगदान आहे. खराब हवामानातही त्याने चांगली खेळपट्टी तयार केली. 10 नियमित आयपीएल मैदानांच्या ग्राउंड्समन आणि क्युरेटर्सना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळतील. तर 3 अतिरिक्त मैदानाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील तुमच्या समर्पण आणि मेहनतीबद्दल धन्यवाद! अशी पोस्ट जय शाह यांनी केली आहे.
विजेत्या आणि उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कम
कालच्या सामन्यांमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या चॅम्पियन संघाला म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सला 20 कोटी रुपये मिळाले आहे. तर उपविजेता संघ सनरायझर्स हैदराबादला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तर राजस्थान रॉयल्सला 7 कोटी रुपये मिळतील. राजस्थानला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6.5 कोटी रुपये मिळणार आहेत. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. कालच्या विजयानंतर कोलकाता नाईट राइडर्सने तिसरे विजेतेपद पटकावले आहे. 2012 मध्ये संघ प्रथमच चॅम्पियन बनला होता. यानंतर त्याने 2014 मध्ये अंतिम सामना जिंकला. आता संघ पुन्हा एकदा चॅम्पियन झाला आहे.