भारतीय कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)
India’s probable squad against West Indies : आशिया कप २०२५ स्पर्धेनंतर वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल तर दुसरा कसोटी सामना १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : IND vs PAK सामन्याने लिहिला नवा इतिहास! दुबईच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस; एकदा वाचाच
वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयकडून पुढील एक-दोन दिवसांत संघ जाहीर ,करणार असल्याची माहिती मिळत आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार हे मात्र निश्चित आहे. कारण शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध उपकर्णधार म्हणून ऋषभ पंत या मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंतला मोठी दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मालिकेतील पाचव्या सामन्यातून बाहेर पडावे लागले होते.
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या आशिया कपमध्ये खेळत असून आशिया कपनंतर तो थेट कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होणार आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाहिल्यांदाच घरच्या मैदानावर मालिका खेळणार आहे. या मालिकेत इंग्लंड दौऱ्याच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करुण नायरला भारतीय कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
अर्शदीप सिंग, करुण नायर, अंशुल कंबोज, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांना इंग्लंड दौऱ्याच्या संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर आणि सरफराज खान संघात परतण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यरवर असणार आहेत. ज्याला इंग्लंड दौऱ्यानंतर आशिया कप संघात देखील स्थान दिले गेले नव्हते.
ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना भारत अ संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांसाठी त्यांची निवड होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप हे निवडकर्त्यांची पसंती असणार आहे. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचा फिरकीपटू म्हणून समावेश असणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : Abhishek Sharma पाकिस्तानवर कडाडला! आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर टोलवला ऐतिहासिक षटकार
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, बी साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नारायण जगदीसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप मोहम्मद, कुलदीप यज्ञ, कुलदीप यज्ञ, बी.