Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…

Hockey India: दरम्यान दुसऱ्या सत्रात बेल्जियमने चांगला खेळ केला. 22 आणि 23 व्या मिनिटाला लागोपाठ 2 गोल बेल्जियमने केले आणि सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2026 | 10:46 AM
hockey world cup 2026

hockey world cup 2026

Follow Us
Follow Us:
  • भारताचा बेल्जियम संघाने केला पराभव 
  • हॉकी वर्ल्डकपमधील भारताचा प्रवास संपला 
  • बेल्जियमने भारताला 4-3 ने हरवले 
Hockey World Cup : नेदरलँड्समध्ये सध्या एफआयएच हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा 2026 सुरू आहे. या स्पर्धेतून भारतीय संघ आधीच बाहेर पडला आहे. दरम्यान नुकताच भारत आणि बेल्जियम या दोन संघांध्ये शेवटच्या स्थानासाठी सामना झाला आहे. या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये झालेल्या या पराभवाने भारत शेवटच्या स्थानी राहिला आहे.

बेल्जियमने भारतीय पुरुष हॉकी संघाचा एफआयएच हॉकी वर्ल्डकपमध्ये 4-3 अशा फरकाने पराभूत केले आहे. शेवटच्या सामन्यात देखील झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाने ही वर्ल्ड कप स्पर्धा 8 व्या स्थानावर राहून संपवली आहे. भारतीय संघासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन तर अभिषेकने एक गोल केला. बेल्जियमच्या चांगल्या बचावामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.

The Indian Men’s Team took on Belgium in their final game of the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026, drawing 3–3 before narrowly going down 3–4 in the shootout in the 7th/8th place clash. 🏑 Here are the moments from a hard-fought final game of the campaign. 🇮🇳… pic.twitter.com/1qG7JmMOBV — Hockey India (@TheHockeyIndia) August 28, 2026

धमाकेदार सुरुवात

भारतीय संघाने या सामन्याची अत्यंत धमाकेदार सुरुवात केली. 6 व्या मिनिटाला अभिषेकने गेलेल्या गोलमुळे भारतीय संघाने आपले खाते उघडले. मात्र मैदानावार 11 पेक्षा जास्त खेळाडू असल्याच्या कारणाने हरमनप्रीत सिंगला यलो कार्ड दाखवण्यात आले. त्याला 5 मिनिटे बाहेर बसावे लागले. बेल्जियमच्या संघाने अनेक पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या खेळाडूंनी बेल्जियमला एकही गोल करून दिला नाही. पहिल्या सत्रात बेल्जियम एक गोल देखील करू शकली नाही.

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

दरम्यान दुसऱ्या सत्रात बेल्जियमने चांगला खेळ केला. 22 आणि 23 व्या मिनिटाला लागोपाठ 2 गोल बेल्जियमने केले आणि सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. तर 31 व्या मिनिटाला भारतीय कर्णधाराने पेनल्टी कोर्नरमध्ये गोल करत सामना बरोबरीत आणून ठेवला. या सामन्याचा शेवट अत्यंत रोमहर्षक असा झाला. 57 व्या मिनिटाला निकोलस डी केरपेलच्या गोलमुळे बेल्जियमने पुन्हा आघाडी घेतली. सामना संपण्यासाठी अवघे काही सेकंड शिल्लक असताना भारताच्या कर्णधाराने गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणून ठेवला.

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

पुरुष हॉकी वर्ल्डकप

एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्डकपमध्ये 51 वर्षांनी पदक जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात भारतीय संघाची सुरुवात धमाकेदार झाली होती. मात्र पहिल्या फेरीत भारतीय संघाने चांगले यश प्राप्त केले होते. मात्र दुसऱ्या फेरीत लागोपाठ पराभव झाल्याने भारताचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. भारताने ही स्पर्धा शेवटच्या म्हणजे 8 व्या स्थानावर राहिला आहे. या संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने अत्यंत चांगली कामगिरी केली. मात्र त्याच्या प्रयत्न अपयशी ठरले. तो भारताला फायनलपर्यंत नेऊ शकला नाही.

Web Title: Belgium team beats mens team india in fih hockey world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Hockey World Cup 2026
  • Indian Hocket Team
  • Sports News

संबंधित बातम्या

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव
1

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव

६ हजारांहून अधिक सायकलस्वार एकत्र येणार!PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य वॉकेथॉन अन् सायकल रॅली
2

६ हजारांहून अधिक सायकलस्वार एकत्र येणार!PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य वॉकेथॉन अन् सायकल रॅली

‘Genome Sequencing’ ने तयार होणार जागतिक चॅम्पियन्स; गुजरात सरकारचा ५ वर्षांचा मास्टरप्लॅन
3

‘Genome Sequencing’ ने तयार होणार जागतिक चॅम्पियन्स; गुजरात सरकारचा ५ वर्षांचा मास्टरप्लॅन

पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद
4

पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.