
Buldhana Fencing Championship 2026
या यशामागे प्रशिक्षक आकाश बनसोड यांचे अथक परिश्रम व नियमित सराव कारणीभूत ठरला. तसेच, असोसिएशनचे सचिव शेषनारायण लोढे, राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त शिक्षक, अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, उपाध्यक्ष मयूर बाहेकर, सहसचिव शिवश्री नीतीन जेऊघाले आणि प्रवीण मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेत सेबर प्रकारात सोमश्री पाटील हिने सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात स्वरा जगताप आणि क्रांती कुलट यांनी कांस्यपदक मिळविले. इपी प्रकारात शर्वरी मिसाळ हिने रौप्यपदक पटकावले, तर अक्षरा पांडव व आरोही क्षीरसागर यांनी कांस्यपदक मिळविले. फॉइल प्रकारात अन्विता सावळे हिने दुहेरी यश मिळवत एक रौप्य आणि एक कांस्यपदक आपल्या नावे केले. तर ओवी आहेर हिने कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने पदक हुकलेल्या. परंतु, आपल्या शानदार खेळाच्या जोरावर रॅकिंगमध्ये ‘टॉप १५’ मध्ये स्थान पटकावणाऱ्या खेळाडूंचेही विशेष कौतुक होत आहे.
बुद्धिबळाच्या पटावर R Praggnanandhaa चा डंका! Grand Chess Tour जिंकणारा पहिला भारतीय