(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
या शर्यतीच्या एका बाजूला स्वीडनची खाजगी इक्विटी कंपनी EQT आहे, ज्याने $2 बिलियन पर्यंत बोली लावली आहे. दुसरीकडे, रंजन पै, कोहलबर्ग क्रॅव्हिस रॉबर्ट्स अँड कंपनी आणि टेमासेक यांचा एक मोठा संघ आहे. आता या दोघांमध्ये थेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. लवकरच अंतिम निर्णय होऊ शकतो. या शर्यतीत बरेच मोठी नावं होती. पण आता काही बड्या नावांनी माघार घेतली आहे. मँचेस्टर युनायटेडचे मालक असलेल्या ग्लेझर कुटुंबानेही या शर्यतीपासून स्वतःला दूर केले आहे. याशिवाय अदार पूनावाला यांनीही या संघात रस दाखवल्यानंतर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता अधिक थेट आणि रोमांचक झाली आहे.
आरसीबीचा सध्याचा मालक डियाजिओने हा करार अंतिम करण्यासाठी ३१ मार्चची अंतिम मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डील असू शकते, असे मार्केट तज्ज्ञांचे मत आहे.
केवळ आरसीबीच नाही तर राजस्थान रॉयल्सबाबतही मोठी खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, अनेक कंपन्यांनी फ्रँचायझीमधील हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे. इथे आदित्य बिर्ला ग्रुप आघाडीवर मानला जातो. याशिवाय अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्झर देखील या शर्यतीत सामील आहेत. राजस्थान रॉयल्ससाठी 1.1 ते 1.35 अब्ज डॉलर्सच्या बोली असल्याच्या बातम्या आहेत.
या सर्व डीलमधून एक गोष्ट स्पष्ट होते की आयपीएल लीगची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. जगभरातील गुंतवणूकदार आता आयपीएल संघांमध्ये पैसे गुंतवण्यास तयार आहेत, त्यामुळे ही लीग खेळाबरोबरच व्यवसायाच्या दृष्टीनेही मजबूत होत आहे. आता आरसीबीचा नवा मालक कोण होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






