Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brijbhushan Singh : बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान; महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली

Brijbhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले आहे. या फौजदारी अपिलावर शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 09, 2026 | 02:50 PM
brijbhushan singh : बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान; महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली

brijbhushan singh : बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान; महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली

Follow Us
Follow Us:
  • कुस्तीपटूंचे सत्र न्यायालयात आव्हान
  • बृजभूषण यांच्या निर्दोष फेरविचार प्रक्रियेवर याचिका
  • जुन्या रुढीवादी दृष्टीकोनाचा आधार
 

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh ) आणि सहआरोपी विनोद तोमर यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले आहे. या फौजदारी अपिलावर शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता २८ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू सत्र न्यायालयात ही अपील याचिका दाखल केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने बृजभूषण यांना या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. सुनावणीसाठी बृजभूषण शरण सिंह स्वतः न्यायालयात उपस्थित होते. यापूर्वी न्यायालयाने बृजभूषण आणि विनोद तोमर यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते.

क्रिकेट जगतातून मोठी बातमी! न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती; १८ वर्षांची झळाळती कारकीर्द संपली

कुस्तीपटूंचे सत्र न्यायालयात आव्हान

दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी बृजभूषण शरण सिंह यांना या प्रकरणात निर्दोष ठरवले होते. चार महिला कुस्तीपटूंनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. विनोद तोमर यांना निर्दोष ठरवण्याच्या आदेशालाही आव्हान देण्यात आले आहे.

मजिस्ट्रेट न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. पुराव्यांचे चुकीच्या पद्धतीने आणि निवडक स्वरूपात मूल्यमापन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा निर्णय अनुमान आणि तर्कांवर आधारित असून, प्रस्थापित कायदेशीर तत्त्वांचा योग्य वापर करण्यात आलेला नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना

जुन्या रुढीवादी दृष्टीकोनाचा आधार

तसेच, पीडितेच्या वर्तनाबाबतच्या जुन्या रूढीवादी दृष्टिकोनाचा आधार निर्णयात घेतल्याचा आक्षेप महिला कुस्तीपटूंनी नोंदवला आहे.

या प्रकरणाला २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. अनेक नामांकित महिला कुस्तीपटूंनी २०१६ ते २०२२ या कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे, भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय आणि अन्य ठिकाणी बृजभूषण शरण सिंह यांनी अनुचित वर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्यावरील आरोप सातत्याने फेटाळले आहेत.

Web Title: Brijbhushan singh case next hearing october 28 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Brij Bhushan Sharan Singh
  • New Delhi
  • Wrestler

संबंधित बातम्या

Delhi Accident : सीमापुरी इमारत अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष
1

Delhi Accident : सीमापुरी इमारत अपघातात आतापर्यंत चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
2

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

Asian Games 2026: फायनलमध्ये अंतिम पंघालची झुंज अपुरी! कुस्तीत भारताला सिल्व्हर मेडल, पदकसंख्येत आणखी भर
3

Asian Games 2026: फायनलमध्ये अंतिम पंघालची झुंज अपुरी! कुस्तीत भारताला सिल्व्हर मेडल, पदकसंख्येत आणखी भर

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण
4

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.