
Buldhana Tug of War Championship
१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय
या स्पर्धेत टग ऑफ वॉरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्रीराम निळे व मोताळा येथील मंगेश पारेकर यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघाने विजय प्राप्त केला. विजेत्या १५ वर्षीय संघात स्नेहल धावे, ऋतुजा भोलाने, राशी बावणे, अक्षरा बावणे, अबोली डोंगरे, अभिनव तायडे, आशिष गोसावी, जय देशमुख, स्वराज ढोण, प्रेम पाटील यांचासमावेश होता.
१७ वर्षीय वयोगटात स्नेहल गाडेकर, दर्शना दळवी, भक्ती निमकडे, राजर्थी पारेकर, संध्या पानपाटील, सुमित शिंबरे, वीरेन गालवंशी, मोहित खिरोडकर, सोमनाथ पाटील, सोहम बोर्ड यांचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र टंग ऑफ बार असोसिएशनचे सचिन गुणिले व राहुल वाघमारे यांच्या हस्ते ट्रॉफी व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. जनता हायस्कूल कोथळी येथे मुख्याध्यापक एस. डी. पोती यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जनता हायस्कूल कोथळी येथील विद्यार्थिनींनी रस्सीखेच स्पर्धेत राज्यस्तरावर बाजी मारल्याचा आनंद ग्रामस्थांनाही झाला. त्यांनी विजेते खेळाडू गावात येताच ढोल-ताशाच्या निनादात त्यांचे जोरदार स्वागत केले. गावातून विजयी खेळाडूंची मिरवणूक काढली.