
IND VS AUS 2nd Test Mohammad Siraj hit Marnus Labuschagne Side with a ball in anger, Huge Uproar in Day-Night Test Match
ICC Champions Trophy 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे तर शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय, मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलेले नाही, ज्याचे कारणही कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान तर 3 वेगवान गोलंदाजांचा सहभाग
सिराजला संघात न घेण्याबाबत रोहित शर्मा म्हणाला, बुमराहबद्दल शंका आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला असा गोलंदाज हवा होता जो सुरुवातीला आणि शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी ठरू शकेल. मोहम्मद शमी परत आला आहे. सिराजबद्दल बोलायचे झाले तर, तो नवीन चेंडूने चांगले खेळतो, पण चेंडू जुना झाल्यावर त्याची प्रभावीपणा कमी होते. म्हणूनच संघात फक्त ३ वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय, आम्ही अष्टपैलू खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे.
भारतीय संघाची घोषणा
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. तर शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग सारखे खेळाडू संघात परतले आहेत, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालेले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माने सिराजला संघात न घेण्यामागील कारणही सांगितले.
जसप्रीत बुमराह अनफीट असल्याने हर्षित राणाला मिळणार संधी
जसप्रीत बुमराह अजूनही अनफीट असल्याने त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी मिळणार असल्याचे चिफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी सांगितले. तरीही हर्षित राणाचे भारतीय संघातील अस्तित्व अजूनही अधांतरीच आहे. कारण अगोदरच मोहम्मद सिराजला बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे आणखी वेगवान गोलंदाज घेताना अगोदर मोहम्मद सिराजचा विचार केला जाईल परंतु जसप्रीत बुमराहच्या जागेवर हर्षित राणाला संधी मिळणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. यानंतर दोघांनीही माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. पाकिस्तानसोबतच युएईमध्येही सामने खेळवले जातील. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.