Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?

Nada action against judoka tulika maan before commonwealth: २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा धक्का बसला आहे. २०२२ ची रौप्यपदक विजेती ज्युडोपटू तुलिका मान हिला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) तात्पुरते निलंबित केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 05:31 PM
Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:
  • Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का
  • पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर
राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेती ज्युडोपटू तुलिका मान हिला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) तात्पुरते निलंबित केले आहे. यामुळे, ती ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा तिच्या निवासाची माहिती दाखल करण्यात ( Whereabout) अयशस्वी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

नाडाच्या कारवाईनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर

नाडाने तुलिका मानवर गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा वेअरअबाउट्स (Whereabout) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यानंतर, एजन्सीने तिला नोटीस बजावत तात्पुरती निलंबनाची कारवाई केली. यामुळे, तिला भारतीय ज्युडो संघातून काढून टाकण्यात आले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ज्युडो प्रशिक्षकाने सांगितले की, तुलिकाने १२ महिन्यांत तीन वेळा वेअरअबाउट्स नियमांचे उल्लंघन केले होते. नाडाने नोटीस बजावल्यानंतर तिला संघातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

खेळाडूने माहिती देणे आवश्यक

वाडाच्या (WADA) नियमांनुसार, कोणत्याही १२ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा माहिती दाखल करण्यात अयशस्वी झाल्यास, चाचण्या चुकल्यास किंवा या दोन्ही गोष्टी घडल्यास डोपिंग-विरोधी नियमांचे उल्लंघन होते. नोंदणीकृत चाचणी गटातील खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षणाची आणि निवासाची माहिती नियमितपणे दाखल करणे आणि स्पर्धेबाहेरील चाचणीसाठी उपलब्ध राहण्याकरिता दररोज ६० मिनिटांचा वेळ देणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

२०२२ मध्ये रौप्य पदक जिंकले

तुलिका मान हिने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये महिलांच्या +७८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला. ग्लासगोमध्येही ती चांगली कामगिरी करून पदक जिंकेल अशी अपेक्षा होती. यापूर्वी गुरुवारी, भारतीय ज्युडो संघाला आणखी एक धक्का बसला. पुरुषांच्या -७३ किलो वजनी गटातील खेळाडू अरुण कुमार याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. स्पर्धेपूर्वी झालेल्या डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याने स्पर्धेतून अपात्र ठरणारा तो पहिला भारतीय ज्युडोपटू ठरला आहे.

भारतीय ज्युडो संघ अद्याप ग्लासगोसाठी रवाना झालेला नाही. ज्युडो स्पर्धा ३१ जुलैपासून सुरू होत असून, संघ २७ जुलै रोजी रवाना होणार आहे.

FIH Youth Hockey 5s : भारताचा हॉकीमध्ये पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’; मोठ्या फरकाने मिळवत कायम ठेवली विजयी मालिका

Web Title: Commonwealth games 2026 tulika maan nada suspension judo player out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय
1

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले
2

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी
3

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.