Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : भारतीय ध्वजावरून वाद चिघळला, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ध्वज नसण्याचा कारण पीसीबीने केलं स्पष्ट

पाकिस्तानमधील कराची स्टेडियमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये भारत वगळता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे फडकवले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 18, 2025 | 08:58 AM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय ध्वज न फडकवण्यावरून वाद आता चिघळत चालला आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा झाला. या सोहळ्याचा अलिकडेच पाकिस्तानमधील कराची स्टेडियमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये भारत वगळता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे फडकवले होते. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता या प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक मोठे विधान आले आहे.

WPL 2025 : आरसीबीचा सलग दुसरा विजय! 8 विकेट्सने केला दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

काय सांगितले पाकिस्तान क्रिकेट बोर्डने?

यंदा चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. पण भारताचा संघ या स्पर्धेसाठी सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानमध्ये जाणार नाही. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत असले तरी, टीम इंडिया त्यांचे सामने दुबईमध्ये खेळणार आहे. त्याचवेळी कराची स्टेडियममध्ये भारतीय ध्वज नसल्याने चाहत्यांमध्ये संताप दिसून येत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की हे निर्देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) आले आहेत आणि सामन्याच्या दिवशी फक्त चार झेंडे फडकवले जाणार आहेत.

#FirstSports: In the ongoing tension surrounding the ICC Champions Trophy, the omission of India’s flag at the Karachi stadium has sparked controversy. What was the reason behind Pakistan not hoisting the Indian flag? Is PCB playing politics? @rupharamani explains. pic.twitter.com/ItSWlIkDdM — Firstpost (@firstpost) February 17, 2025

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “आयसीसीने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांच्या दिवशी फक्त चार झेंडे फडकवण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये आयसीसी (इव्हेंट ऑथॉरिटी), पाकिस्तान (इव्हेंट यजमान) आणि त्या दिवशी सामने खेळणाऱ्या दोन्ही संघांचे झेंडे असतील ते खूप सोपे आहे.”

पाकिस्तानचा संघ २०२५ चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करत आहे त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जाणार आहेत. आता, वृत्तांनुसार, रोहित शर्मा आणि त्याचा संघ कराची, लाहोर किंवा रावळपिंडीमध्ये एकही सामना खेळत नसल्यामुळे पाकिस्तानमधील या तीन ठिकाणी भारतीय ध्वज दिसणार नाही अशी शक्यता आहे.

No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations. – Absolute Cinema,… pic.twitter.com/2zmcATn7iQ — Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) February 16, 2025

पाकिस्तानत्यांचा पहिला सामना उद्या म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे तर टीम इंडिया २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर, टीम इंडिया २३ फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तानशी सामना खेळेल. जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये आधीच बरीच क्रेझ आहे.

 

Web Title: Controversy over indian flag in champions trophy 2025 as pcb clarified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy 2025
  • cricket
  • ICC
  • PCB
  • Team India

संबंधित बातम्या

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…
1

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…

ICC vs Trump : अमेरिकेने ICC प्रमुखांवर निर्बंध लादले; न्यायालयाने म्हटले ‘स्वातंत्र्यावर उघड हल्ला’
2

ICC vs Trump : अमेरिकेने ICC प्रमुखांवर निर्बंध लादले; न्यायालयाने म्हटले ‘स्वातंत्र्यावर उघड हल्ला’

IND Vs SL: विजयश्री मिळाली पण आनंद साजरा करता येईना! WTC Points Table मध्ये बसला फटका
3

IND Vs SL: विजयश्री मिळाली पण आनंद साजरा करता येईना! WTC Points Table मध्ये बसला फटका

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर
4

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.