Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cristiano Ronaldo: चाहत्यांना अर्ध्या रात्री दिला सुखद धक्का, 10 वर्ष नात्यात असणाऱ्या गर्लफ्रेंडबरोबर केलं लग्न

Cristiano Ronaldo: फुटबॉलचा दिग्गज खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने पोर्तुगालमध्ये एका खाजगी समारंभात त्याची दीर्घकाळची जोडीदार जॉर्जियाना रॉड्रिग्जसोबत लग्न केले आहे. फोटो झाला व्हायरल

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 12, 2026 | 10:18 AM
Cristiano Ronaldo ने उरकले लग्न, फोटो झाला व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Cristiano Ronaldo ने उरकले लग्न, फोटो झाला व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • क्रिस्टियानो रोनाल्डोने केले जॉर्जियाना रॉड्रिग्जशी लग्न 
  • १० वर्षापासून आहे नात्यात 
  • चाहत्यांना दिला सुखद धक्का 
Cristiano Ronaldo: फुटबॉलचा दिग्गज खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. या पोर्तुगीज फुटबॉल दिग्गजाने ११ ऑगस्ट रोजी आपली दीर्घकाळची जोडीदार जॉर्जियाना रॉड्रिग्ज हिच्याशी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला असून त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. ही बातमी पसरताच, सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव दिसून येत आहे. रोनाल्डोने स्वतः जॉर्जियानासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करून या बातमीला दुजोरा दिला, ज्यामध्ये ते एकमेकांचा हात धरून त्यांच्या लग्नाच्या अंगठ्या दाखवत आहेत.

रोनाल्डो आणि जॉर्जियाना विवाहबद्ध

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा पोर्तुगालची राजधानी लिस्बनजवळील कास्केस या सुंदर किनारपट्टीच्या शहरात पार पडला. कोणताही मोठा समारंभ न करता, हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी आणि जिव्हाळ्याचा होता, ज्यात केवळ हे जोडपे आणि त्यांची पाच मुले उपस्थित होती. रोनाल्डो आणि जॉर्जियाना यांची पाच मुले म्हणजे क्रिस्टियानो ज्युनियर, जुळी मुलं इवा आणि मातेओ, अलाना मार्टिना आणि बेला एस्मेराल्डा.

Fifa World Cup 2026: …पोर्तुगालचा पराभव अन् त्याला झाला अश्रू अनावर! Cristiano Ronaldo चे वर्ल्ड कपचे स्वप्नं भंगले

या नात्याची सुरुवात २०१६ मध्ये झाली

या जोडप्याच्या नात्याची सुरुवात जवळपास एक दशकापूर्वी, २०१६ मध्ये स्पेनची राजधानी माद्रिद येथे झाली. त्यावेळी रोनाल्डो रियल माद्रिदकडून खेळत होता आणि जॉर्जिना गुचीच्या एका बुटीकमध्ये विक्री सहाय्यक म्हणून काम करत होती. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर काही दिवसांतच, एका ब्रँड इव्हेंटमध्ये ते पुन्हा भेटले आणि त्यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले. स्पेनमध्ये सुरू झालेला हा प्रवास आता इटली, इंग्लंड आणि सौदी अरेबियापर्यंत पोहोचून एका सुंदर आणि सुखद वळणावर पोहचला आहे आणि त्यांचे कुटुंबही बहरले आहे. 

५ मुलांचे पालक

जॉर्जिनाने नोव्हेंबर २०१७ मध्ये तिची पहिली मुलगी, अलाना मार्टिना हिला जन्म दिला. दरम्यान जॉर्जिनाने सरोगसीद्वारे जन्मलेल्या जुळ्या मुलांना (माटेओ आणि इवा) आणि रोनाल्डोचा मोठा मुलगा, क्रिस्टियानो ज्युनियर, यांना नेहमीच स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवले ​​आहे. ते नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ दिली आहे.

रोनाल्डोचा विक्रम आश्चर्यकारक आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १४६ गोल करणाऱ्या आणि पाच वेळा बॅलोन डी’ओर जिंकणाऱ्या या ४१ वर्षीय खेळाडूने अलीकडेच आपल्या विक्रमी सहाव्या विश्वचषकात पोर्तुगालचे प्रतिनिधित्व केले. मात्र, ती मोहीम संघासाठी विशेष संस्मरणीय ठरली नाही. सध्या, रोनाल्डो सौदी प्रो लीग क्लब अल-नसरकडून खेळतो आणि या शनिवारी सुरू होणाऱ्या त्यांच्या नवीन देशांतर्गत हंगामात मैदानात उतरण्यास सज्ज आहे.

Cristiano Ronaldo Retirement:’हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?’ बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

Web Title: Cristiano ronaldo marries long term girlfriend georgina rodriguez in portugal photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Football
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड
1

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा
2

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद
3

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…
4

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.