डी. गुकेश आणि हिकारू नाकामुरा(फोटो-सोशल मीडिया)
D. Gukesh vs Hikaru Nakamura: डी. गुकेशने सेंट लुईस, मिसूरी, यूएसए येथे झालेल्या क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊनच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखला आहे. तो जागतिक बुद्धिबळ विजेता का आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. जगातील अव्वल चार खेळाडूंचा समावेश असलेली ही एक छोटी रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आहे. या स्पर्धेत गुकेश व्यतिरिक्त, मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना देखील सहभागी होत आहेत. कार्लसनविरुद्ध गुकेशची सुरुवात जरी खराब झाली असली तरी त्याने नाकामुरा आणि कारुआनाविरुद्ध लागोपाठ दोन विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. नाकामुराविरुद्धचा हा विजय जास्तच विशेष ठरला आहे. काही दिवसांपूर्वी जपानी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने गुकेशवर मिळवलेल्या विजयानंतर गैरवर्तन केले होते.
हेही वाचा : काय सांगता! भारत-पाक खेळाडू करणार ड्रेसिंग रूम शेअर? BBL मध्ये दिसणार ‘हे’ खेळाडू एकत्र
क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाऊन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, गुकेशला पहिल्या फेरीत मॅग्नस कार्लसनकडून 0.5-1.5 असा पराभव पत्करावा लागला. तथापि, त्याने जगातील सर्वोत्तम रॅपिड स्पेशालिस्ट मानल्या जाणाऱ्या हिकारू नाकामुराविरुद्ध १.५-०.५ असा विजय मिळवत जोरदार पुनरागमन करून आपली क्षमता सिद्ध केली. तथापि, विजय मिळवल्यानंतर डी गुकेश शांत राहिल्याचे दिसून आले णि काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रतिस्पर्ध्यासारखा आनंद साजरा करणे त्याने टाळले. डी गुकेशने पहिल्या दिवसाचा शेवट फॅबियानो कारुआनाविरुद्ध २-० असा असा दमदार विजय मिळवून केला, अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचा शेवट ४/६ गुणांनी असा झाला.
चेकमेट: यूएसए विरुद्ध भारत स्पर्धेनंतर, हिकारू नाकामुराने आपल्या चालीचा बचाव केला आणि म्हटले की ते केवळ मनोरंजनासाठी होते, अपमान करण्यासाठी नाही. पुढच्या वेळी जर त्याने गुकेशला पराभूत केले तर त्याने त्याला बॉलीवूड गाणे गाण्याची संधी देखील येईल असे म्हटले.
नाकामुरा म्हणाला की तो अपमान नव्हता, जर तो कॅंडिडेट्ससारखा गंभीर सामना असता, तर अर्थातच, तुमहाच्याकडून असे कधीही केले नसते. कोणी देखील करणार नाही! तो मॅग्नस कार्लसन, हान्स निमन, अनिश गिरी किंवा मी असलो तरी काही एक फरक पडत नव्हता. पण तो एक पूर्णपणे असा एक मनोरंजक कार्यक्रम होता. डी गुकेशने या घटनेवर एक देखील प्रतिक्रिया दिली नाही.






