जसप्रीत बुमराह (फोटो- ians)
भारतीय क्रिकेट संघाचा सध्या न्यूझीलंड दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात तीन सामन्यांची अनौपचारिक टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. सध्या या सिरीजमधला पहिला सामना सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंड ‘अ’ संघात होणाऱ्या या मालिकेतील तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार असल्याचे समोर येत आहे. त्याच्यासोबत ऋषभ पंत देखील खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह बऱ्याच कालावधीनंतर बुमराह क्रिकेटच्या मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसऱ्या सामन्यात त्याच्या समावेशामुळे भारतीय ‘अ’ संघाची ताकद वाढणार आहे. तसेच ऋषभ पंत देखील संघात सहभागी झाल्यास फलंदाजी देखील मजबूत होण्यास मदत होईल.
भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात तिसरी आणि शेवटची अनौपचारिक कसोटी 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत खेळण्याची शक्यता आहे. बुमराहसोबतच धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याचेही या सामन्यात खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंच्या पुनगमनामुळे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा हा तिसरा अनधिकृत कसोटी सामना चुरशीचा होणार आहे.
IND Vs NZ: काय तरी करा अन् ‘हा’ रेकॉर्ड मोडाच! Team India उद्या ‘या’ मैदानात न्यूझीलंडविरुद्ध…
Ans: भारत न्यूझीलंडमध्ये 19 ते 23 आणि 27 ते 1 डिसेंबर दरम्यान टेस्ट सिरीज होणार आहे.
Ans: इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए च्या तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराह खेळण्याची शक्यता आहे.






