Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या 9 विद्यार्थीही भारताच्या बाजूने ध्वज फडकावणार आहेत. यापैकी दोन आजी विद्यार्थी (सध्या शिकताहेत) आहेत, तर इतर सात दिल्ली यूनिवर्सिटीचे माजी विद्यार्थी आहेत. या 9 पैकी 6 विद्यार्थ्यांनी शूटिंगमध्ये भाग घेतला आहे. डीयूचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग यांनी सांगितले की, या 9 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी नेमबाजीत, एक ॲथलेटिक्स आणि एक टेबल टेनिसमध्ये सहभागी होत आहे. यासोबतच डीयूचा एक माजी विद्यार्थीही नेमबाजी प्रशिक्षक म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून खेळाडू कौतुकास्पद कामगिरी करून देशासाठी पदके जिंकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टोकियो ऑलिम्पिकमध्येसुद्धा दिल्ली यूनिवर्सिटीच्या विद्यार्थिनी
कुलगुरू म्हणाले की 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये चार डीयू विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी खेळाडूंची संख्या दुपटीने वाढली आहे. DU क्रीडा संचालक डॉ. अनिल कुमार कलकल यांनी सांगितले की, यावेळी सहभागी झालेल्या 9 खेळाडूंपैकी 3 खेळाडू मनू भाकर, अमोज जेकब आणि मनिका बत्रा यांनी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला आहे. यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतातून एकूण 117 खेळाडू सहभागी होत आहेत.
नेमबाजीतील निम्म्याहून अधिक महिला खेळाडू दिल्ली यूनिवर्सिटीच्या
डीयूचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग म्हणाले की, यावेळी भारतातून एकूण २१ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत सहभागी होत आहेत. यापैकी 11 महिला खेळाडू असून या 11 महिला खेळाडूंपैकी 6 दिल्ली यूनिवर्सिटीच्या विद्यार्थिनी आहेत. टेबल टेनिसमध्ये भारतीय संघातील एकूण 8 खेळाडूंपैकी 4 महिला खेळाडू आहेत, त्यापैकी एक DU मधील आहे.