
Badminton
देवने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत २१-१६ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. देव १८-१६ असा आघाडीवर असताना निश्चलकडून सर्व्हिस फॉल्ट झाला. त्याचा फायदा घेत देवने आघाडी कायम राखत दुसरा गेमही २१-१६ असा जिंकला आणि विजेतेपदावर नाव कोरले. देव कंचन स्कूलमध्ये बारावी इयत्तेत शिक्षण घेत असून मुंबईतील नितीश बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत भारताच्या पवन सुरेश आणि पुनीत सुरेश या जोडीने इंडोनेशियाच्या आर्यबका ओक्टा डिसाबियन आणि मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया यांचा २५-२३, २१-१९ असा पराभव केला. ३२ मिनिटांच्या या सामन्यात भारतीय जोडीने दोन्ही गेममध्ये निर्णायक क्षणी आघाडी घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया आणि अफिजाह रहमाधानी यांनी भारताच्या पुनीत सुरेश आणि दीपक राज आदिती यांचा २४-२६, २१-१७, २१-१६ असा संघर्षपूर्ण पराभव करत विजेतेपद मिळवले.
पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
मुलींच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या चन्थरात मर्ंदाकुल आणि पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन या जोडीने चौथ्या मानांकित भारताच्या दिया भीमैया आणि कीर्थी मंचला यांचा २१-१५, २१-११ असा पराभव केला. ३४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात थायलंडच्या जोडीने सुरुवातीपासून वर्चस्व राखत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पुणे महापौर करंडक आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरण उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुंदर शेट्टी, गिरीश नातू, मंजुषा सहस्रबुद्धे आणि योनेक्स सनराईजचे बालकिशन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, सरचिटणीस सीए रणजीत नातू, सहसचिव आनंद जोशी, खजिनदार सारंग लागू, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, मिहीर रातांजनकर, उपाध्यक्ष अविनाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.