फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारतीयांनी अविश्वसनीय कामगिरी करून भारताला उत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे. भारताने आतापर्यत ५ सुवर्णपदक नावावर केले आहेत. यामध्ये पहिले सुवर्णपदक शूटिंगमधून अवनी लेखाराने मिळवले. त्यानंतर दुसरे सुवर्णपदक भारताचा स्टार बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि तिसरे सुवर्णपदक भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतीलने मिळवले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील आर्चरीमध्ये भारताच्या हरविंदर सिंहने गोल्ड मेडल सामन्यामध्ये एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदक नावावर केलं. त्यानंतर पॅरिस सातव्या दिवशी भारताने पाचव्या गोल्ड मेडलवर कब्जा केला आहे. मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताच्या धरमबीर यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरल आहे.
Dharambir wins Gold for India in Club Throw F51
– 5th Gold for Team India 🫶
WELL DONE DHARAMBIR 🇮🇳❤️ pic.twitter.com/g2JtHKWzKe
— The Khel India (@TheKhelIndia) September 4, 2024
मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताच्या धरमबीरने फायनलमध्ये त्याचे पहिले चार थ्रो अमान्य राहिले. त्यानंतर त्याचा पाचवा थ्रो हा ३४.९२ मीटर फेकला आणि सुवर्ण पदक नावावर केले. शेवटचा आणि सहावा थ्रो धरमबीरने ३१.५९ फेकला. प्रणव सुरमा बद्दल बोलायचं झालं तर त्याने दमदार कामगिरी केली. प्रणव सुरमाने पहिलाच थ्रो ३४.५९ एवढा टाकला आणि सिल्वर मेडल नावावर केले. त्यांचा दुसरा थ्रो ३४.१९ आणि तिसरा थ्रो अमान्य राहिला. चौथा थ्रो ३४.५० मीटर होता. पाचवा आणि सहावा थ्रो अनुक्रमे ३३.९० आणि ३३.७० मीटर होता.
टीम इंडियाच्या पॅरा खेळाडूंनी आतापर्यत पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. ८ सप्टेंबर पर्यत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारताचे आर्चर आणि भारताचे ॲथलेटिक्स ॲक्शनमध्ये असणार आहेत. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या नजरा आज भारतीय पॅरा खेळाडूंवर असणार आहेत. गोळाफेक आणि आर्चरीमध्ये भारताच्या दमदार ॲथलेटिक्सनी कमालीची कामगिरी करून मेडल खात्यात भर दिली आहे. आज हरविंदर आणि पूजा हे दोघे मिक्स टीमसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.