Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त

स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात पुढील वर्षाच्या यजमानपदाचा मान धाराशिव जिल्ह्याला देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते यजमानपदाचा ध्वज औपचारिकरित्या स्वीकारण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 04:52 PM
महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली क्रीडा स्पर्धा
धारशिव क्रिकेट संघाने जिंकले प्रथमच विजेतेपद
धाराशिव जिल्ह्याला स्पर्धेचे यजमानपद बहाल

धाराशिव: छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या क्रिकेट (Cricket) संघाने प्रथमच विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली आणि संघाच्या उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर हा अभूतपूर्व विजय साकार झाला. विशेष म्हणजे या यशासोबतच पुढील वर्षाच्या स्पर्धेचे यजमानपदही धाराशिव जिल्ह्याला बहाल करण्यात आले.

अंतिम सामन्यात नांदेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धाराशिव संघाने दमदार फलंदाजी करत १२ षटकांत १४५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना नांदेड संघ १३४ धावांवर बाद झाला.सामन्याच्या निर्णायक टप्प्यात जिल्हाधिकारी पुजार यांनी गोलंदाजीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत २ षटकांत केवळ १३ धावा देत प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाज बाद केला आणि सामना धाराशिवच्या बाजूने झुकवला.

शरद मोटे आणि अनिकेत राऊत यांनी प्रभावी साथ दिली. या थरारक सामन्यात धाराशिव संघाने संयम व आक्रमक खेळाचे उत्तम मिश्रण दाखवत विजेतेपद पटकावले. संघात कीर्ती किरण पुजार (कर्णधार), हेमंत ढोकले (उपकर्णधार), प्रसाद साळुंके, शरद मोटे, शुभम काळे, विनोद चुकेवाड, ओंकार पवार, रणधीर भोसले, आकाश वानखेडे, रणदीप सूर्यवंशी, अनिकेत राऊत, शिवराज खुर्दे, किरण पाटील, शिवराज शिंदे, सुरज घोसले यांचा समावेश होता.

यजमानपदाचा ध्वज स्विकारला
स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात पुढील वर्षाच्या यजमानपदाचा मान धाराशिव जिल्ह्याला देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते यजमानपदाचा ध्वज औपचारिकरित्या स्वीकारण्यात आला. विजेतेपदासोबतच यजमानपदाचा मान मिळाल्याने धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि खेळाडूंच्या टाळ्यांच्या गजरात हा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी पुढील वर्षी अधिक भव्य, सुयोजित आणि दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

इतर स्पर्धांमध्येही धाराशिवची चमकदार कामगिरी
क्रिकेटसह विविध वैयक्तिक, सांघिक आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्येही धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदक म्हणून मृणाल जाधव (तहसीलदार) आणि संतोष पाटील (नायब तहसीलदार) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. समूह नृत्य प्रकारात प्रियांका लोखंडे, विशाखा बलकवडे, समाधान जावळे, बालाजी लाकाळ, अनिता पाटील, विष्णू थोरात, प्रकाश चंदनशिवे, महेश क्षीरसागर, रोहन शिंगाडे, शीतल आमझरे, नंदिनी, दीपा मुळूक यांच्या पथकाने विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक नृत्यात तेजश्री जगदाळे हिने द्वितीय स्थान मिळवले.

क्रीडा स्पर्धांतील वैयक्तिक यश
अफसर शेख २०० मीटरमध्ये द्वितीय, मोनिका मसुडगे भालाफेकमध्ये प्रथम, वैष्णवी मसे १०० मीटर व २०० मीटरमध्ये द्वितीय, विष्णू थोरात ३ किमी चालणेमध्ये प्रथम प्रभावती उंबरे टेबल टेनिसमध्ये प्रथम, रिंग टेनिसमध्ये द्वितीय यांनी अशी कामगिरी बजावली आहे. या सर्व यशामागे जिल्हाधिकारी पुजार, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, दत्तू शेवाळे, गणेश शिंदे, प्रवीण धरमकार, संतोष राऊत, स्वाती शेंडे, अरुणा गायकवाड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांचे मार्गदर्शन लाभले. धाराशिव जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करत इतिहासात प्रथमच या दुहेरी कामगिरीसह विजेतेपद आणि यजमानपद प्राप्त केले असून, हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Dharashiv cricket team win chhatrapati sambhajinagar revenue sports tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • cricket news
  • Dharashiv News
  • Sports News

संबंधित बातम्या

Live मॅच दरम्यान हार्ट अटॅक, मैदानावरच सोडले प्राण; ‘या’ खेळाडूची अचानक Exit
1

Live मॅच दरम्यान हार्ट अटॅक, मैदानावरच सोडले प्राण; ‘या’ खेळाडूची अचानक Exit

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
2

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव
4

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.