रायझिंग स्टार ब्ल्यु संघाचा विजय (फोटो- सोशल मिडिया)
दुसऱ्या सामन्यात गुरूप्रसाद स्वामी याने केलेल्या ७९ धावांच्या जोरावर रायझिंग स्टार ऑरेंज संघाने रायझिंग स्टार रेड संघाचा पराभव केला. रायझिंग स्टार ऑरेंज संघाने १७९ धावा धावफलकावर लावल्या. गुरूप्रसाद स्वामी याने ४३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. याला उत्तर देताना रायझिंग स्टार रेड संघाचा डाव १४६ धावांवर मर्यादित राहीला. विश्वजीत नायक (२२ धावा) आणि संदीप भुर्के (२१ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
गटसाखळी फेरीमध्ये रायझिंग स्टार ब्ल्यु संघ (२ विजय, १ पराभव, ०.५२५ धावगती) आणि रायझिंग स्टार रेड संघ (२ विजय, १ पराभव, ०.५१७ धावगती) अशी कामगिरी केली होती. अव्वल सरासरी धावसंख्येच्या जोरावर रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मॅकमन कन्व्हेइंग अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन जीत पंकज यांच्या हस्ते करण्यात आले. यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संयोजक आणि संचालक सतिश सराफ, अजय सैनीस आणि नितीन सामल यांसह सहभागी संघांचे खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या रायझिंग स्टार ब्ल्यु संघाला करंडक आणि ५२ हजार रूपयांचे पारितोषिक तर, उपविजेत्या रायझिंग स्टार रेड संघाला करंडक आणि २६ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
रायझिंग स्टार ब्ल्युः २० ष टकात ५ गडी बाद १९१ धावा (धीरज कुमार ८० (५१, ८ चौकार, ५ षटकार), निलेश सामंत ३८, ललित कुमार २-२१) वि.वि. रायझिंग स्टार यलोः २० षटकात ९ गडी बाद १५० धावा (समीर मुखर्जी २५, राजेश इति २०, गोविंद सनल ३-१०, निशांत नायर २-३२, राजीब मुखर्जी २-१५); सामनावीरः धीरज कुमार; रायझिंग स्टार ऑरेंजः २० षटकात ९ गडी बाद १७९ धावा (गुरूप्रसाद स्वामी ७९ (४३, ९ चौकार, ४ षटकार), राजेश तांदल ३०, मौनांग पटेल ३-४१, दिपक जोशी १-१५) वि.वि. रायझिंग स्टार रेडः २० षटकात ७ गडी बाद १४६ धावा (विश्वजीत नायक २२, संदीप भुर्के २१, दिपक आचार्य १६, नाना म्हात्रे १६, विजय नवले नाबाद २१, भुषण देशपांडे २-२१, राजशेखर रेड्डी २-३१); सामनावीरः गुरूप्रसाद स्वामी.
IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय






