भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. या रोमांचक सामन्यात रांची येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने उत्कृष्ट आणि दमदार खेळी केली. भारताची पहिल्या डावात अत्यंत वाईट अवस्था होती. भारताच्या संघाने ११७ धावांवर ७ विकेट गमावले होते. ध्रुव जुरेलने ३९ धावा करत टीम इंडियाला वाईट परिस्थितीतून सोडवले. यानंतर जुरेलने खालच्या फळीतील फलंदाजांसह महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला सन्मानजनक स्थितीत आणले.
रांची कसोटीत भारताने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या. येथे जुरेलने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने १४९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ९० धावा केल्या. जरी त्याचे शतक हुकले. टॉम हार्टलीने त्याला बोल्ड केले. जुरेलच्या या खेळीनंतर क्रिकेट तज्ज्ञांपासून क्रिकेटप्रेमींपर्यंत सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. काहीजण त्याच्या खेळीला सलाम करत आहेत तर काहीजण त्याला पुढचा धोनी म्हणत आहेत.
वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया
वीरेंद्र सेहवागने त्याच्या X अकाउंटवर पोस्ट केली आहे त्यामध्ये तो म्हणाला की, कोणतीही मीडिया हाईप नाही, नाटक नाही, फक्त काही उत्कृष्ट कौशल्ये आणि अत्यंत कठीण परिस्थितीत शांतपणे उत्कृष्ट स्वभाव दर्शविला. ध्रुव जुरेल खूप छान. हार्दिक शुभेच्छा.
No media hype, no drama, just some outstanding skills and quietly showed great temparement in a very difficult situation.
Very Well done Dhruv Jurel. Best wishes. pic.twitter.com/XOtUYd8Je3 — Virender Sehwag (@virendersehwag) February 25, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे –
Whole of India to Dhruv Jurel today ? What an impressive performance both behind and in front of the wicket by Dhruv. The importance of this knock and the partnership with Kuldeep cannot over overstated. Top notch game awareness ?? #INDvENG pic.twitter.com/vyujRgRnkQ — Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 25, 2024
Should we bow, yeah Dhruv Jurel is a King❤️? pic.twitter.com/dmZypyBoOT — Shivani (@meme_ki_diwani) February 25, 2024
Captain Rohit Sharma appreciating the brilliant knock of Dhruv Jurel ??!! pic.twitter.com/C8GS4NNGsE — Vishal. (@SPORTYVISHAL) February 25, 2024
Sunil Gavaskar said, “watching the presence of mind of Dhruv Jurel makes me think he’s the next MS Dhoni in the making”. pic.twitter.com/jxGgIaXcKl — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 25, 2024