वसिम अक्रम आणि अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला. तर आशिया कपमधील दूसरा सामना भारत आणि यूएई या दोन संघात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने यूएईवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर यूएई संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त सर्व बाद ५७ धावाच केल्या. कुलदीप यादव(४)आणि अष्टपैलू शिवम दूबे(३) या जोडीने यूएई संघाला खिंडार पाडले. तर धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी केवळ २७ चेंडूत विजय संपादन केला. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने जोरदार फटकेबाजी केली. त्याने १६ चेंडूत ३० धावा काढल्या आणि तो बाद झाला. त्याच्या या वादळी खेळीने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम थक्कच झाला आणि म्हणाला की मी असे याआधी कधी बघितले नाही.
हेही वाचा : IND vs UAE : कुलदीप यादवने घेतली UAE ची फिरकी; दिग्गज आर अश्विनला टाकले ‘या’ विक्रमात मागे..
यूएई संघाला भारतीय गोलंदाजांनी ५७ धावांवर गुंडाळल्यावर धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी यूएईवर चांगलेच आक्रमण केले. या दरम्यान डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्माने फक्त १६ चेंडूंचा सामना करत १८७.५० च्या स्ट्राईक रेटने ३० धावा फटकावल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर असणारा माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रम देखील अभिषेक शर्माची फलंदाजी पाहून आश्चर्यचकित झालेचे दिसून आले. विशेष म्हणजे शर्माने डावाच्या सुरवातीला पहिल्या दोन चेंडूंवर दोन मोठे फटके मारले. अभिषेकने यूएईचा गोलंदाज हैदर अलीच्या गोलंदाजीवर डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑफवर वाइड षटकार ठोकला. यानंतर, त्याने दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार मारला.
Wasim Akram said (after seeing Abhishek sharma’s first ball six followed by 4” :
” I HAVE NEVER SEEN SOMETHING LIKE THIS IN T20”
(Sony Sports)pic.twitter.com/mHSbBZlwJu
— NKRian (VK) OG🔫 SSMB 29 ⚡ (@AnandSRH) September 10, 2025
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची ही फटकेबाजी पाहून वसीम अक्रम त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. तो म्हणाला की “मी यापूर्वी टी-२० मध्ये असे याआधी कधीही पाहिले नव्हते.”
भारताकडून या सामन्यात चांगली गोलदाजी बघायला मिळाली. भारतीय गोलंदाजीसमोर यूएई संघाने गुढघे टकेले आणि संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला आहे. कुलदीप यादवने ७ धावा देत ४ विकेट घेतल्या तर शिवम दुबेने ४ धावा देत ३ विकेट घेतल्या. प्रतिउत्तरात भारताने २७ चेंडूतच हा सामना जिंकला आणि आपल्या मोहिमेची विजयी सुरवात केली.
हेही वाचा : Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ