भारत विरुद्ध इंग्लंड पुरुष संघाची कसोटी मालिका सुरूवायला फक्त काही तास शिल्लक राहिले असताना भारतीय महिला संघ देखील इंग्लंड विरुद्ध एक दिवसीय मालिका त्याचबरोबर टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी आता भारतीय महिला संघ हा इंग्लंडला रवाना झाला आहे. भारतीय संघाची श्रीलंकेमध्ये झालेल्या ट्राय सिरीज मध्ये चांगली कामगिरी राहिली होती त्यामुळे आता इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाची कामगिरी कशी राहिली असेल यावर चाहत्यांची नजर असेल.
इंग्लड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ रवाना. फोटो सौजन्य - BCCI
भारताचा संघ हरमनप्रीत कारच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. ट्राय सिरीज मध्ये भारताचे संघाने श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. फोटो सौजन्य - BCCI
भारतीय महिला संघामध्ये देखील अनेक युवा खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. फोटो सौजन्य - BCCI
रिचा घोषच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. ती भारतीय संघासाठी शेवटच्या काही ओव्हरमध्ये येऊन मोठे फटकेबाजी करण्यात तिचा संघाला फायदा होतो. फोटो सौजन्य - BCCI
मागील सिरीजमध्ये स्मृती मानधना हिने शतक झळकावले होते त्यामुळे तिची कामगिरी या दौऱ्यावर कशी राहील हे पाहणे मनोरंजक ठरेल. फोटो सौजन्य - BCCI
जेमिमा रॉड्रिक्स हिने भारतीय संघासाठी ट्राय सिरीजमध्ये शतक झळकावले होते या दौऱ्यावर तिची कामगिरी कशी राहील ती एक भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकते. फोटो सौजन्य - BCCI
दीप्ती शर्मा हि भारतीय संघाची अनुभवी अष्टपैलू आहे तिने मागील सामन्यांमध्ये देखील तिच्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले होते. फोटो सौजन्य - BCCI