Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs NZ: लॉर्ड्सवर न्यूझीलंडने पत्करली शरणागती, पहिल्या डावात १४० धावांवर ऑलआऊट होऊनही इंग्लंडचा शानदार विजय; नेमकं काय घडलं?

ENG vs NZ 1st Test: इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडविरुद्धची सुरू असलेली तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. या सामन्यात गोलंदाजांचे कौशल्य दिसून आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 06:13 PM
ENG vs NZ: लॉर्ड्सवर न्यूझीलंडने पत्करली शरणागती, पहिल्या डावात १४० धावांवर ऑलआऊट होऊनही इंग्लंडचा शानदार विजय; नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:
  • लॉर्ड्सवर न्यूझीलंडने पत्करली शरणागती!
  • पहिल्या डावात १४० धावांवर ऑलआऊट होऊनही इंग्लंडचा शानदार विजय
  • नेमकं काय घडलं?
ENG NZ 1st Test Highlights: इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ जून रोजी सुरू झाला. इंग्लंडने शानदार कामगिरी करत हा सामना चोथ्या दिवशी ११५ धावांनी जिंकला. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले, तर फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. हॅरी ब्रूकने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले, परंतु दुसऱ्या डावात तो खाते न उघडताच बाद झाला.

इंग्लंडने पहिल्या डावात केल्या १४० धावा केल्या

पहिल्या डावात इंग्लंडचा संघ ३९.४ षटकांत १४० धावांत सर्वबाद झाला. हॅरी ब्रूकशिवाय संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष प्रभाव पाडता आला नाही; ब्रूकने ७१ चेंडूंत ५६ धावा केल्या. याव्यतिरिक्त, सलामीवीर बेन डकेटने ३७ चेंडूंत १९ धावा, एमिलिओ गेने १४ चेंडूंत ८ धावा आणि बेन स्टोक्सने २३ चेंडूंत १२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात काईल जेमिसनने ५ आणि नॅथन स्मिथने ३ बळी घेतले.

England take the five remaining wickets before lunch to start their Test summer with a win at Lord’s! Scorecard: https://t.co/7J4h4qaMJi pic.twitter.com/3mV9Yas96I — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 7, 2026

Manav Suthar Milestone: पदार्पण असावं तर असं! पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट तर २५ वर्षांपूर्वीचा दुर्मिळ रेकॉर्ड काढला मोडीत

१४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९.५ षटकांत ११३ धावांत सर्वबाद झाला. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांना खातेही उघडता आले नाही, तर कर्णधार टॉम लॅथम १ धाव काढून बाद झाला. काईल जेमिसन हा संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला; त्याने २९ चेंडूंत ३८ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सनेही ३९ चेंडूंत ३४ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात ऑली रॉबिन्सनने ५ बळी घेतले.

इंग्लंडचा विजय

पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या डावात १० गडी गमावून २२६ धावा केल्या. एमिलिओ गे हा संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला; त्याने ९५ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने दुसऱ्या डावात सहा बळी घेतले. २५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या ४०.३ षटकांत १३८ धावांत सर्वबाद झाला. डेव्हन कॉनवेने ९१ चेंडूंत ४१ धावा केल्या, तर ग्लेन फिलिप्सने ५२ चेंडूंत ४४ धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात गस ॲटकिन्सनने पाच बळी घेतले. परिणामी, इंग्लंडने हा सामना ११५ धावांनी जिंकला आणि सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत

Web Title: Eng vs nz lords test england wins after 140 all out in first innings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • cricket news
  • ENG vs NZ
  • Sports News
  • Test cricket

संबंधित बातम्या

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?
1

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य
2

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य

Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय
3

Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय

Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!
4

Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.