सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
DC Vs MI : आयपीएल २०२५ मध्ये काल पार पडलेल्या ६३ व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत पराभव करून दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. सूर्यकुमारच्या ४३ चेंडूत ७३ धावांच्या (७ चौकार आणि ४ षटकार) नाबाद खेळीच्या जोरावर त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावांपर्यंत मजल मारता आली. नंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ फक्त १२१ धावाच करू शकला. परिणामी मुंबईने हा सामना ५९ धावांनी आपल्या खिशात टाकला. सूर्यकुमार यादवच्या या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब प्रदान करण्यात आला आहे. या सामन्यात सूर्याने टी-२० मधील एका विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे.
सूर्यकुमार यादवने एका विश्वविक्रमाशी बरोबरी केलीय आहे. त्याने आता टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सलग २५+ धावा करण्याचा विक्रम रचला आहे.सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाच्या जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे. टेम्बा बावुमाने टी-२० क्रिकेटमध्ये सलग १३ वेळा २५+ धावा करण्याचा भीम पराक्रम देखील केला आहे. सूर्याने लागोपाठ १३ वेळा टी-२० क्रिकेटमध्ये २५+ धावा करण्यात तो यशस्वी झाला आहे.
या दरम्यान सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामनावीर विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत सूर्या चौथ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी एकूण ९ वेळा सामनावीराच्या पुरस्कारावर नाव कोरण्यात यश मिळवले आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना आठ वेळा सामनावीराचा किताब जिंकला होता. त्याच वेळी, आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. रोहितने मुंबईसाठी १७ वेळा सामनावीराचा किताब जिंकला आहे.
हेही वाचा : LSG vs GT : गुजरात टायटन्सची नजर आता टॉप २ वर, तर लखनौ आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी उतरणार मैदानात…
तसेच सूर्यकुमार यादवने आयपीएल हंगामात सर्वाधिक सलग २५+ धावा करणारा फलंदाज ठरला आहे. असे करून त्याने केन विल्यमसनची बरोबरी साधली आहे. २०१८ मध्ये, विल्यमसनने आयपीएलच्या एका हंगामात सलग १३ वेळा २५+ धावा करण्याचा विक्रम केला होता.