
क्रिकेट क्लबचा मोठा घोटाळा, काळीमा फासणारी घटना (फोटो सौजन्य - X.com)
क्लिकगेटमागील संपूर्ण कहाणी काय आहे?
Cheating level pro max
A club cricketer in England clicked his fingers to simulate a nick to the keeper. Bat nowhere near the ball but the Umpire heard the sound and gave it out. The English spirit of cricket on display. pic.twitter.com/koU7Mhmkki — ηᎥ†Ꭵղ (@nkk_123) July 28, 2026
हा वाद नॉर्टनचा फलंदाज नोमान शब्बीरच्या बाद होण्यावरून निर्माण झाला. जेव्हा गोलंदाजाने गोलंदाजी केली, तेव्हा चेंडू बॅटच्या अगदी जवळून गेला, पण तो बॅटला लागला नाही. जेव्हा चेंडू फलंदाजाच्या बॅटजवळून गेला, तेव्हा स्लिपमधील क्षेत्ररक्षकाने चुटकी वाजवली, ज्यामुळे मोठा आवाज झाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पडताच, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अपील केले. चेंडू बॅटला लागल्यामुळे तो आवाज झाला असे पंचांना वाटले आणि त्यांनी बोट वर केले.
IND vs SL: 4 दुर्दैवी खेळाडू! श्रीलंका सिरीजमधून थेट बाहेरचा रस्ता, एकाचा तर पदार्पणानंतरच पत्ता कट
फलंदाजाने या निर्णयाला आव्हान दिले
फलंदाज नोमान शब्बीरने चेंडू त्याच्या बॅटला लागला नसल्याचा दावा करत या निर्णयाला आव्हान दिले. त्याने स्लिपमधील क्षेत्ररक्षकाकडे बोटही दाखवले. तथापि, पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांचा असा विश्वास आहे की, क्षेत्ररक्षकाने बोट वाजवून मुद्दाम पंचांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यांमध्ये डीआरएस किंवा रिव्ह्यूची सुविधा उपलब्ध नसते.
अशी घटना यापूर्वीही घडली आहे
@Saltburncc First slip clicks his fingers to imitate an edge, bat nowhere near it and given out.
This is about the worst case of cheating I’ve ever seen in cricket.
Apparently, their keeper has a huge amount of catches this season.@talkSPORT @bbctms @SkyCricket @TailendersPod pic.twitter.com/iM7lZfKF5q — Ben Mummery (@ben_mummery) July 27, 2026
सॉल्टबर्न क्रिकेट क्लब संघाने असे करण्याची ही पहिली वेळ नाही. सोशल मीडियावर झालेल्या वादानंतर, क्षेत्ररक्षक असे करत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मिडल्सब्रो सेकंड इलेव्हनचा कर्णधार रॉरी कॉटरिलने दावा केला आहे की, सॉल्टबर्नविरुद्धच्या हंगामातील पहिल्या सामन्यातील पराभवावेळी त्याच्या संघात बोट वाजवण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्याने तो व्हिडिओ शेअर केला. वॉल्व्हरस्टन एफसीविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याचा एक व्हिडिओ देखील ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये एक फलंदाज अशाच परिस्थितीत बाद होताना दिसत आहे.
चौकशी सुरू
नॉर्थ यॉर्कशायर आणि साउथ डरहॅम क्रिकेट लीगने सांगितले आहे की, त्यांना एक तक्रार प्राप्त झाली असून चौकशी सुरू झाली आहे. लीगने X वर लिहिले, “शनिवारी झालेल्या डिव्हिजन टू सामन्यातील कथित घटनांबाबत लीगला एक औपचारिक तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरू करण्यात आली असून, औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही.”