फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore match report : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना झाला या सामान्यत बंगळुरूच्या संघाने दमदार विजय नावावर केला आहे. मागील पराभवानंतर आता बंगळुरूच्या संघाने स्पर्धेमध्ये दमदार कमबॅक केला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर १५ धावांनी हरवलं आहे. या सीझनचा मुंबई इंडियन्सचा हा चौथा सामन्यात पराभव आहे तर बंगळुरूच्या संघाने या स्पर्धेचा तिसरा विजय नावावर केला आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगलंच धुतलं.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईच्या संघाने पहिल्या १० ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावले. रोहित शर्माने या सामन्यात ९ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या. रायन रिकेल्टन याने १० चेंडूंमध्ये १७ धावा केल्या. विल जॅक्सने संघासाठी १८ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. माझे सामनामध्ये अर्धशतक झळकावणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमारने २६ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या.
Match 21. Royal Challengers Bengaluru Won by 12 Run(s) https://t.co/Arsodkwgqg #MIvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स गमावून २२१ धावा केल्या. यामध्ये विराट कोहली ने ४२ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या या मतदानात दोन षटकार आणि आठ चौकार ठोकले. तर देवदत्त पडिकलने संघासाठी २२ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. त्याचबरोबर बंगळुरूचा कर्णधार रजतने ३२ चेंडूमध्ये ६४लावा केल्या. तर जितेश शर्माने १९ मध्ये ४० धावा करून नाबाद राहिला.
बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर संघाचा फिरकी गोलंदाज कृणाल पंड्याने संघासाठी दमदार गोलंदाजी केली आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान केले. कृणाल पंड्याने ४ ओव्हर टाकल्या यामध्ये त्याने ४५ धावा देत ४ विकेट्स नावावर केले. तर जोश हझलवूड याने संघासाठी २ विकेट्स घेतले. तर यश दयाल याने संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. भुवनेश्वर कुमारने संघासाठी १ विकेट घेतला.
मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पंड्याने संघासाठी की दोन विकेट्स घेतले तर ट्रेंट बोल्टने संघासाठी 2 विकेटची कमाई केली. विघ्नेश पुथुरने एक विकेट घेतला. दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर आणि विल जॅक्स यांच्या हाती एकही विकेट लागला नाही.