मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील सुमित्रा दशरथ पेटकुले हया मुलगा जगदीशसोबत मिळून राहात होते. याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी मूल पोलिस स्टेशनला माहिती देताच पोलिस पथक डोंगरगांव येथे जावून पंचनामा केला. व सुमित्राबाईचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
मद्यपी मुलाचा राग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
हा नेहमी मद्यप्राशन करून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आई-मुलगा मिळून राहात होते. दरम्यान गुरुवारी रात्री आईने कारल्याची भाजी बनविल्याने जगदिशचा पारा चढला आणि आई त्राबाईसोबत वाद घालून मारहाण केली. या मारहाणीत अर्थ गतप्राण झाली आणि सकाळी उठल्या नाही. त्यामुळे घराशेजारी महिलांनी घरी जावून बघितले असता त्यामृतावस्थेत दिसून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शवविच्छेदन झाल्यानंतर शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. आरोपीला मूल पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रपूरमध्ये १९ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पैशांच्या वादातून टोकाचे पाऊल
पोंभुर्णा शहरातील रामनगर परिसरातील एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी ७वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भारत प्रमोद गुरनुले (१९, रा. पोंभूर्णा) असे मृताचे नाव आहे.
भारत गुरनुले याने सोमवारी शिवरात्रीनिमित्त मार्कंड्याच्या जत्रेला जाण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. वडिलांनी पैसे नंतर देती, असे सांगितल्याने रागाच्या सायंकाळी तो ५ वाजताच्या सुमारास घराबाहेर निघून गेला,बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान लुंबिनी बुद्ध विहाराच्या पटांगणातील विहिरीजवळ त्याची चप्पल आढळून आली. यामुळे संशय बळावल्याने कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे.
Ans: आईने कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून वाद होऊन मारहाण.
Ans: तिचा मुलगा जगदीश दशरथ पेटकुले.






