फोटो सौजन्य - BuchiBabuSana
Tilak Verma visited Ram Charan : २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व खेळाडू सध्या आपापल्या घरी आहेत. २०२६ चा टी-२० विश्वचषक भारतीय संघाने जिंकला त्यानंतर भारताच्या कमालीच्या कामगिरीनंतर बीसीसीआयने मोठी बक्षिस रक्कम खेळाडूंसाठी जाहीर केली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यामधील मंत्र्यांनी त्यांना बक्षीस रक्कम देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तिलक वर्मा देखील हैदराबादमध्ये आहेत. काल त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली.
आता त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार राम चरण यांची भेट घेतली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राम चरणने त्यांना एक खास भेटवस्तूही दिली. व्हिडिओमध्ये, टिळक वर्मा सर्वात आधी आपल्या गाडीतून उतरून चित्रपटाच्या सेटवर असलेल्या राम चरणकडे जातात. यावेळी राम चरण आणि टिळक एकत्र कॅमेऱ्यासमोर येतात. त्यानंतर राम चरण टिळक वर्मा यांचे कौतुक करतो. नंतर टिळक चाहत्यांशी संवाद साधतात. दरम्यान, राम चरण टिळकांना एक जुनी बॅट भेट देतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे.
T20 World Cup champion @TilakV9 visited the sets of #Peddi ❤🔥 He caught a glimpse of the film’s sports sequences and was thoroughly impressed.#PEDDI WORLDWIDE RELEASE ON 30th APRIL, 2026 Mega Power Star @AlwaysRamCharan @NimmaShivanna #JanhviKapoor @BuchiBabuSana @arrahman… pic.twitter.com/D5i8u7cTpg — BuchiBabuSana (@BuchiBabuSana) March 18, 2026
२०२६ च्या टी२० विश्वचषकात खेळल्यानंतर, तिलक वर्मा आता आयपीएल २०२६ मध्ये खेळणार आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळेल. २०२६ च्या टी२० विश्वचषकात तिलक वर्माची कामगिरी सरासरी होती. त्याने नऊ सामन्यांमध्ये २९.५७ च्या सरासरीने २०७ धावा केल्या. विश्वचषकात तिलकने एकही अर्धशतक झळकावले नाही. त्याने १५४.४७ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
मात्र, टिळक आता आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आपली छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. तो आयपीएल २०२२ पासून मुंबईकडून खेळत आहे. गेल्या हंगामात त्याने १६ सामन्यांच्या १३ डावांमध्ये ३१.१८ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या ५४ आयपीएल सामन्यांमध्ये टिळकने ३७.४७ च्या सरासरीने १४९९ धावा केल्या आहेत.






