भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान(फोटो-सोशल मीडिया)
The BCCI honored the Indian blind women’s team: भारतीय अंध महिला संघाने पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयकडून भारतीय अंध महिला संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे. भारतीय अंध महिला संघ १९ डिसेंबर रोजी बीसीसीआय मुख्यालयात पोहोचला, जिथे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष रघुराम भट्ट यांनी बीसीसीआय मुख्यालयात भारतीय अंध महिला संघाचे कौतुक आणि त्यांचा सन्मान केला. त्यांनी खेळाडूंची भेट घेत भारतीय क्रिकेटच्या वतीने बोर्डाच्या शुभेच्छा देखील दिल्या. महिला अंध विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला आणि विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करत भारताने सामना सहज जिंकला. ११५ धावांचा पाठलाग करताना संघाने केवळ १२.१ षटकांतच सात गडी राखून विजय मिळवला.
कर्णधार दीपिका टीसीने आपल्या संघाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, “आमच्या संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली. आम्ही पुरुष संघासोबत देखील खेळण्यास सज्ज आहोत.”
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्याकडून संघाला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करण्यात आले. भविष्यातील दौऱ्यांसाठी किट आणि प्रवास सहाय्य देऊन अंध महिला क्रिकेटला पाठिंबा देण्याच्या बीसीसीआयच्या वचनबद्धतेचा उल्लेख केला. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्याकडून या विजयाचे वर्णन एक मैलाचा दगड, राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत म्हणून करण्यात आले. तसेच संघाला आणखी उच्च ध्येय ठेवण्यास प्रोत्साहित देखील केले. उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की ही कामगिरी लाखो लोकांना प्रेरणा देणारी आहे.
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५७ धावांनी रोमांचक विजय मिळवला, जिथे ऑस्ट्रेलिया २९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शलक नाही. संघाने पाकिस्तानविरुद्ध देखीळ शानदार प्रदर्शन केले आणि सामना जिंकण्यासाठी १३६ धावांचे लक्ष्य केवळ १०.२ षटकांत गाठले. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने पराभूत केले आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारताने अंतिम सामन्यात नेपाळविरुद्धही दमदार कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.






