Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक! 64 संघांना संधी मिळणार? फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे संकेत

64 teams will participate in fifa world cup 2030 gianni infentino: २०३० फिफा विश्वचषकासाठी संघांची संख्या ६४ पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. प्रत्येक देशाला विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पाहण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 13, 2026 | 04:19 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक
  • विश्वचषकात 64 संघांना संधी मिळणार?
  • FIFA अध्यक्षांचा मास्टरप्लॅन
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ४ संघ सेमनिफायनलसाठी निश्चित झाले आहेत. २० जुलैला अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. फिफा विश्वचषक २०३० मध्ये संघाची संख्या ४८ वरुन ६४ होण्याची शक्यता आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी २०३० च्या फिफा पुरुष विश्वचषकातील संघांची संख्या ६४ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जाईल, असे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सध्याचा २०२६ चा विश्वचषक संपल्यानंतर संबंधित फिफा समित्या या विषयावर चर्चा करणार आहे.

भारताची सुवर्णकन्या! नीरू धांडाने ISSF विश्वचषकात रचला इतिहास, महिलांच्या ट्रॅपमध्ये जिंकले पहिले Gold Medal

प्रत्येक देशाला खेळण्याची संधी मिळायला हवी

स्विस मीडिया आउटलेट ‘ब्लू स्पोर्ट’ला दिलेल्या मुलाखतीत इन्फँटिनो म्हणाले की, ‘या विश्वचषकानंतर संबंधित समित्यांमध्ये २०३० च्या विश्वचषकात ६४-संघांना खेळवण्याच्या मुद्द्यावर निश्चितपणे चर्चा केली जाईल. प्रत्येक देशाला विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. जगभरातील संघांचा स्तर सातत्याने सुधारत आहे. जर लहान देशांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही, तर त्यांची पुढे जाण्याची प्रेरणा कमी होईल.’

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला २०२६ चा फिफा विश्वचषक हा ४८ संघांचा समावेश असलेला इतिहासातील पहिला विश्वचषक आहे . यापूर्वी, १९९८ ते २०२२ पर्यंत विश्वचषकात ३२ संघ सहभागी झाले होते.

४८ संघांचे स्वरूप पूर्णपणे यशस्वी

फिफाचे अध्यक्ष इन्फँटिनो यांनी ३२ वरून ४८ संघांपर्यंतचा विस्तार हा पूर्णपणे यशस्वी असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय फुटबॉलच्या जागतिक विकासासाठी अत्यंत सकारात्मक ठरला आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात जर ६४-संघांचे स्वरूप लागू केले गेले, तर त्यामुळे अधिक देशांना सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र सामन्यांची संख्या, आयोजन आणि लॉजिस्टिक्स यांसारखी आव्हानेही वाढतील.

२०३० चा विश्वचषक ऐतिहासिक ठरेल

२०३० चा फिफा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरेल, कारण ही स्पर्धा तीन खंडांतील सहा देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यामध्ये उरुग्वे, अर्जेंटिना, पॅराग्वे, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन यांचा समावेश आहे. १९३० मध्ये पहिल्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवलेला उरुग्वे देश एका विशेष सामन्याचे आयोजन करेल.

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

Web Title: Fifa world cup 2030 64 teams proposal gianni infantino

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल
1

FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल

Norway vs England: बेलिंगहॅमचा डबल धमाका! नॉर्वेवर मात करत इंग्लंडची सेमिफायनलमध्ये दमदार एन्ट्री
2

Norway vs England: बेलिंगहॅमचा डबल धमाका! नॉर्वेवर मात करत इंग्लंडची सेमिफायनलमध्ये दमदार एन्ट्री

FIFA World Cup 2026: इंग्लंड विरुद्ध नॉर्वे महामुकाबला! विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोण मारणार बाजी?
3

FIFA World Cup 2026: इंग्लंड विरुद्ध नॉर्वे महामुकाबला! विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोण मारणार बाजी?

Spain beat Belgium: स्पेनचा जलवा कायम! अखेरच्या क्षणी मारली बाजी; बेल्जियमला नमवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री
4

Spain beat Belgium: स्पेनचा जलवा कायम! अखेरच्या क्षणी मारली बाजी; बेल्जियमला नमवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.