Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील कॅनबेरामध्ये खेळला जात असलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ या सामन्यात मजबूत दिसत होता.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 05:53 PM
IND vs AUS 1st T20: Rain in Canberra! First match between India and Australia called off; Gill-Surya's innings in vain

IND vs AUS 1st T20: Rain in Canberra! First match between India and Australia called off; Gill-Surya's innings in vain

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ पाच सामन्यांच्या टी२० मालिकेची सुरुवात
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द 
  • सूर्या आणि गिल यांची शानदार खेळी 
India vs Australia first T20 match cancelled : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरामध्ये खेळला गेला खरा परंतु, या मैदानावर पावसाने तूफान फटकेबाजी केल्याने पहिला सामना रद्द करण्यात आला. सुरुवातीपासूनच हवामानामुळे सामन्यात व्यत्यय आला, ज्यामुळे सामना १८ षटकांपर्यंत कमी करावा लागला. तथापि, खेळ पुन्हा सुरू झाला असताना, ४.४ षटकांनंतर पाऊस पुन्हा परतला, ज्यामुळे सामना थांबवण्यात आला. भारत या सामन्यात चांगलाच मजबूत स्थितीत होता, परंतु पावसाने खेळात खोडा घातला.

हेही वाचा : Diana Pundole : पुण्याच्या डिएना पुंदोलेचा जगात डंका! Ferrari 296 GTS मध्ये भाग घेऊन रचला इतिहास! ठरली पहिलीच….

भारताची दमदार सुरुवात

पाऊस थांबण्यापूर्वी, भारताने ९.४ षटकांत ९७ धावांवर एक विकेट गमावली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल चांगली फलंदाजी करताना दिसत होते.  दोन्ही फलंदाजांनी जलद धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्यांच्या फलंदाजीमुळे प्रेक्षकांना आशा निर्माण झाली आहे की ही जोडी मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

The first #AUSvIND T20I has been abandoned due to rain. 🌧️ Scorecard ▶️ https://t.co/VE4FvHBCbW#TeamIndia pic.twitter.com/biJYDFe9Ah — BCCI (@BCCI) October 29, 2025

सूर्या आणि गिलने लगावले चौफेर फटके..

सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्याने १४ चेंडूंचा सामना करत  १९ धावाच करू शकला. त्याला  नाथन एलिसने बाद केले. त्यानंतर, धावांसाठी संघर्ष करणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केली. आशिया कप २०२५ मध्ये त्याची बॅट शांतच राहिली होती, परंतु या सामन्यात त्याने दाखवून दिले की त्याचा फॉर्म पुन्हा परतला आहे.

भारतीय फलंदाजांकडून या डावात शानदार कामगिरी करण्यात आलो. सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले. शुभमन गिलने उत्कृष्ट खेळ केला, त्याने २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लागवला. दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील त्याच्याच शैलीत फलंदाजी करताना केवळ २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून नाथन एलिसने १ विकेट काढली.

हेही वाचा : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

 

Web Title: First t20 match between india and australia abandoned due to rain marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Shubhman Gill
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात
1

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय
2

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल
3

IND vs AUS: भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची कसोटी! टीम इंडिया-कांगारूंची टक्कर; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला? नोट करा शेड्यूल

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
4

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.