डिएना पुंदोले(फोटो-सोशल मीडिया)
Pune’s Diana Pundole creates history :पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुणेकरांना अभिमानान वाटेल, पुण्यालाच नाई ते देशाला अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. पुण्याची डिएना पुंदोलेनं रेसिंग या पुरूषांच्या समजल्या जाणाऱ्या खेळात आपला दबदबा दाखवून दिला आहे.ती Ferrari in an international championship मध्ये रेस करणारी पहिली भारतीय महिला ठरून डिएना पुंदोलेनं इतिहास रचला आहे. ती फेरेरी क्लब चॅलेंज मीडल इस्टमध्ये नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान सहभागी होणार असून ती Ferrari 296 Challenge कार चालवताना दिसणार आहे. ही स्पर्धा दुबईच्या फॉर्मुला वन सर्कीट, अबु धाबी, बेहरीन, कतार आणि सौदी अरेबिया सारख्या प्रसिद्ध ट्रॅक्सवर रेसिंग करणार आहे.
३२ वर्षाची डिएनाने यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तीन म्हणाली की, हा खरंच एक चांगला सन्मान आहे असं म्हटलं आहे. “मिडल ईस्ट फेरारी क्लब चॅलेंज मध्ये भाग घेणं आणि पहिली भारतीय म्हणून भाग घेणं हा मोठाअभिमानाचा क्षण असून हा फक्त माझ्यासाठी नाही तर भारतातील मोटरस्पोर्ट्समधील सर्व महिलांसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. मला आशा आहे की यामुळं देशातील अनेक महिलांना रेसिंगकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे.” डिएना पुंदोलेने विशेषतः पुरुषांचे वर्चस्व असलेल्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात हे यश संपादन केले आहे.
२०२४ मध्ये, पुंदोले यांनी मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर MRF सॅलून कार्सचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. तसेच शीर्ष पुरुष प्रतिस्पर्धकांना हरवून राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
डिएना यांच्या रेसिंग प्रवासाची सुरुवात २०१८ मध्ये झाली. त्यांनी जेके टायर वुमन इन मोटरस्पोर्ट्स कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हापासून, त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सातत्याने प्रगती करत इंडियन टूरिंग कार्स आणि MRF सॅलून कार्स यांसारख्या विविध श्रेणींमध्ये प्रभावी पोडियम स्थाने मिळवण्यात यश मिळवले.
डिएना पुंदोले या आपली रेसिंगची आवड निर्माण करण्याचे श्रेय त्यांचे दिवंगत वडील यांना देतात. डिएना २५० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने रेस करण्याच्या मागणीला सामोरे जाण्यासाठी त्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे कठोर प्रशिक्षण घेत असतात.
डिएना पुंदोले यांच्या फेरारी चॅलेंजमध्ये सहभागाला अलाईन्ड ऑटोमेशन आणि फेरारी नवी दिल्लीकडून मोठा पाठिंबा आहे. हा सहभाग जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






