नवी दिल्ली – FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात सुरू झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर आहे. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड ठेवली आहे. चेंडू ताब्यात घेण्यातही अर्जेंटिना पुढे आहे. अर्जेंटिनाने ६० टक्के चेंडूवर ताबा ठेवला आहे. त्याचबरोबर फ्रान्सचा चेंडूवर ताबा ४० टक्के आहे.
सामन्याचे अपडेट्स
पूर्वार्धात अर्जेटिंनाने 2 गोल केले. तर डी मारियाने 36व्या मिनिटाला एक गोल केला.
मेसीने 23व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला, अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ सुरू. 25 मिनिटांनतर स्कोअर लाइन 1-0
22 वर्षीय ज्युलियन अल्वारेझनेही सुरुवातीच्या मिनिटाला लक्ष्य केले. 15 मिनिटांनंतर स्कोअर लाइन 0-0 आहे.
अर्जेंटिनाने पहिल्या हाफच्या पहिल्या 5 मिनिटांत 2 हल्ले केले. त्याने गोलवर 2 शॉट्स मारले.
1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. विश्वविजेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे काही तासांमध्ये कळणार आहे.