
india vs sri lanka
भारताचा दुसरा डाव १९३ रन्सवर आटोपला. भारताने श्रीलंकेला ३७२ रन्सचे टार्गेट दिले आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने ८८ रन्सवर ४ विकेट्स गमावल्या आहेत. भारताला ६ विकेट्स जिंकण्यासाठी आवश्यक आहे. तर श्रीलंकेला २८८ रन्सची गरज आहे. मात्र उद्या गॉल कसोटीदरम्यान हवामान कसे असणार ते जाणून घेऊयात.
गॉल कसोटी सामन्यात सामना ९.४५ वाजता सुरू होणार आहे. ज्यामध्ये पहिल्या सत्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता तापमान ३० डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर या वेळेत ४९ टक्के इतकी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ११ वाजल्यानंतर ही टक्केवारी ५२ पर्यन्त जाण्याची शक्यता आहे. तर दुपारी १२ वाजता ५५ ते ६० टक्के पावसाची शक्यता देण्यात आली आहे. जर हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पाऊस झाला तर ते टीम इन्डियसाठी चांगले नसणार आहे.
IND Vs SL: ‘तू चल, मी आलो’…! श्रीलंकेने गमावल्या झटपट ४ विकेट्स; Team India विजयाच्या उंबरठ्यावर
मात्र शेवटच्या दिवशी दुसरे सत्र पावसाशिवाय खेळले जाऊ शकते. एक वाजल्यानंतर २५ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संध्याकाळी ६ पर्यन्त २० टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेवटचे दोन सत्र नियमित होण्याची शक्यता आहे. भारताला सामना जिंकण्यासाठी उद्याच्या दिवसात ६ विकेट्स पटकावणे आवश्यक असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतासाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे.
भारताला सामना जिंकण्यासाठी उर्वरित ६ विकेट्सची गरज आहे. तर श्रीलंकेला विजयासाठी अजून २८८ रन्सची गरज आहे. सध्या कर्णधार धनंजय डी सिल्वा नाबाद खेळत आहे. उद्या, १९ ऑगस्ट रोजी सामन्याचा अंतिम दिवस असून गॉलमधील हवामान टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकते. भारतीय गोलंदाजांना पाचव्या दिवशी लवकरात लवकर उर्वरित ६ विकेट्स मिळवून विजय निश्चित करावा लागेल, अन्यथा पाऊस श्रीलंकेसाठी फायदेशीर ठरू शकतो.