रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli-Rohit Sharma in 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा जागतिक क्रिकेट विश्वात चांगलाच दबदबा राखून आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत, व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले स्थान अधिक बळकट केले. कारण, दशकांच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच भारतीय संघ हॅटट्रिकसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी येण्यास सज्ज झाला आहे.
२०२३ च्या विश्वचषकचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला होता. या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पचवावा लागला. तथापि, वर्षभर उत्कृष्ट क्रिकेटमुळे, भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला आहे.
गेल्या तीन वर्षांत, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी शानदार राहिली आहे. खरं तर, २०१० पासून विराट कोहली आणि रोहित शर्मा सातत्याने भारताचे अव्वल क्रमांकाचे फलंदाज राहिले आहेत. २०१० ते २०२५ पर्यंत अव्वल क्रमांकाचे भारतीय फलंदाजांच्या यादीबबद्दल जाणून घेऊया.
हेही वाचा : Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर
मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगलाच प्रभाव दिसून आला. गेल्या तीन वर्षांत त्याची फलंदाजी अधिकच खुलून दिसत आहे. २००७ ते २०२५ या दीड दशकाच्या कारकीर्दीमध्ये, रोहित शर्माने २७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.२१ च्या सरासरीने ११५१६ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३३ शतके झळकवली आहेत. गेल्या तीन वर्षांत, २०२३ ते २०२५ पर्यंत, रोहित शर्माने ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१.५५ च्या सरासरीने २०६२ धावा काढल्या असून ज्यामध्ये त्याने चार शतके ठोकली आहेत. २०२५ च्या अखेरीस, तो अखेर आयसीसी क्रमवारीत नंबर १ क्रमांकाचा खेळाडू बनला आहे तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता.






