
Sports Week in Goenka College
नवा मालक, नवी सुरुवात… RCB चं नाव बदलणार? आर्यमन बिर्लांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…
वास्केटबॉलमध्ये अन्सार रेघीवाले, रियाज चौधरी, समीर नौरंगाबादी व तौसीन मुन्नीवाले यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. व्हॉलिबॉलमध्ये ओम कराडे, अहमद खेतीवाले, वसीम फकीरावाले, फरदीन दर्गेवाले, तौसीन मुन्नीवाले व रेहान खेतीवाले यांच्या संघाने बाजी मारली. स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभागातर्फे डॉ. अंजली बर्डे व प्रा. शशिकांत नांदगावकर, महाविद्यालयाचे अधीक्षक मनोज राठोड, प्रा. मनोज पवार, प्रा. मुकुंद काळे, डॉ. सुनील राठोड, आदी उपस्थित होते.
मैदानी स्पर्धांमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या गटात बारावीतील कपिल वरघट याने प्रथम, तर तौसीफ बेनीवाले याने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात कोमल पारडे प्रथम, तर संस्कृती तोरसे द्वितीय ठरली. २०० मीटर धावण्यात सम्राट बोरकर प्रथम, तर तौसीफ बेनीवाले द्वितीय आला. ४०० मीटरमध्ये कपिल वरघट प्रथम, तर अरसुल याने द्वितीय क्रमांक मिळविला. १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत फरदीन दर्गे याने प्रथम क्रमांक पटकावला. गोळाफेकमध्ये तोहसीफ नौरंगाबादी प्रथम, तर तौसीफ बेनीवाले द्वितीय ठरला.