हंगेरी – भारताच्या गोल्डन बॉयनं इतिहास रचला आहे. जागतिक भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 88.17 मीटरपर्यंत भालाफेक करत, नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. तर पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले. (Golden boy made history! Suvarnavedh by Neeraj Chopra, the first Indian to win a gold medal at the World Championships, how far did he throw the javelin)
.@Neeraj_chopra1 brings home a historic gold for India in the javelin throw ?#WorldAthleticsChamps pic.twitter.com/YfRbwBBh7Z — World Athletics (@WorldAthletics) August 27, 2023
सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय…
दरम्यान, नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला. नीरज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. पाकिस्तानच्या अशरफ नदीम याने दुसरा क्रमांक पटकावत सिल्वहर मेडलची कमाई केली. नीरजच्या या कामगिरीमुळ त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
टोकियो ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल
२०२० साली जपानमधील टोकियो येथे पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करत, भारताला भालाफेकमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. यानंतर पुन्हा एकदा त्याने सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरजने 2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती नीरज तेव्हा अॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. आता 7 वर्षांनी नीरजने इतिहासाची पुनरावृत्ती करत सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.






