Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs PBKS : पंजाब किंग्सचा गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचा डोंगर; श्रेयस अय्यरची विस्फोटक खेळी..  

आयपीएल 2025 चा 5 वा सामना आज 25 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे.  गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्सने २४३ धावा केल्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 25, 2025 | 09:20 PM
GT vs PBKS: Punjab Kings' 244-run mountain against Gujarat Titans; Shreyas Iyer's explosive innings..

GT vs PBKS: Punjab Kings' 244-run mountain against Gujarat Titans; Shreyas Iyer's explosive innings..

Follow Us
Close
Follow Us:

GT vs PBKS : आयपीएल २०२५  चा 5  वा सामना आज 25  मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे.  गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचे आव्हान दिले आहे. श्रेयस अय्यरच्या ९७ धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने  २४३  धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी जीटीला  २४४ धावा कराव्या लागणार आहे. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट्स ३ घेतल्या.

पंजाब किंग्स संघाचा डाव..

कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब किंग्स संघाने प्रथम फलंदाजी केली. पंजाब किंग्स संघाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर प्रभसिमरन सिंगच्या रूपात पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. तो ८ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. त्याला कसिगो राबाडाने बाद केले. तर दूसरा सालमीवीर युवा प्रियांश आर्य आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण करायला अवघ्या ३ धावा बाकी असताना झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याला रशीद खानने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

त्यांनंतर चार नंबरवर आलेला अजमतुल्ला ओमरझाई जास्त वेळ टिकाव धरू शकला नाही. तो १५  चेंडूत १६  धावा करून बाद झाला. त्याला साई किशोरने बाद केले. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल देखील साई किशोरच्या पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू  बाद झाला. त्याला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉइनिसने थोडी फटकेबाजी केली परंतु तो २० धावाच करू शकला. त्याला साई किशोरने तंबूत पाठवले.

या दरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयश अय्यरने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत जीटीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ४२ चेंडूत ९७  धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ५ चौकर यानी ९ षटकार लगावले आहे. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शशांक सिंग १५ चेंडूत ४४ धावा करत नाबाद राहिला. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट्स ३ घेतल्या. तर कसिगो राबडा यानी राशीद खान यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.

हेही वाचा : IPL 2025 सामन्यांमध्ये सर्रास बेटिंग, पेन ड्राईव्हमध्ये सर्व माहिती; अंबादास दानवेंकडून महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप..

दोन्ही संघांचा या हंगामातील  हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या मोहिमीची विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.

श्रेयस अय्यर आयपीएल  च्या सर्वात महागड्या कर्णधारांच्या यादीत ऋषभ पंतनंतर दुसऱ्या स्थानावर जाऊन बसला आहे. यापूर्वी अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्याने गेल्या वर्षी 2024 मध्ये कोलकाता संघाला आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावून दिले होते. अशा स्थितीत पंजाब किंग्ज संघाला या मोसमात देखील अय्यरकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

हेही वाचा : GT vs PBKS : गोलंदाजांचा वेग की फलंदाजांची हाणामारी? अहमदाबादची खेळपट्टी नेमकी कशी? जाणून घ्या…

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचे संभाव्य अकरा खेळाडू..

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

 

Web Title: Gt vs pbks punjab kings set a target of 244 runs for gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • Shreyas Iyer
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

BCCI चा ऐतिहासिक निर्णय, Vaibhav Sooryavanshi साठी बदलले नियम? लवकरच दिसणार Team India च्या जर्सीत
1

BCCI चा ऐतिहासिक निर्णय, Vaibhav Sooryavanshi साठी बदलले नियम? लवकरच दिसणार Team India च्या जर्सीत

बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार
2

बॅन बॅन बॅन…! पुन्हा ‘ही’ चूक केल्यास Shreyas Iyer ला महागात पडणार; BCCI मोठी कारवाई करणार

Ayush Mhatre ने ‘चेन्नई’ गाजवलं! तर दुबेने 200 पार पोहोचवलं; PBKS ला विजयासाठी 210 धावांची गरज
3

Ayush Mhatre ने ‘चेन्नई’ गाजवलं! तर दुबेने 200 पार पोहोचवलं; PBKS ला विजयासाठी 210 धावांची गरज

CSK vs PBKS Live: चेपॉकमध्ये धावांचा पाऊस पडणार? श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
4

CSK vs PBKS Live: चेपॉकमध्ये धावांचा पाऊस पडणार? श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.