Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 Team: हार्दिक पांड्याचा पत्ता झाला कट! कुलदीप यादवचाही गेम ओव्हर, समोर आले मोठे कारण

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० संघ जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना डच्चू मिळाला असून वैभव सूर्यवंशीची वर्णी लागली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 06, 2026 | 03:03 PM
हार्दिक - कुलदीप यादवला डच्चू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हार्दिक - कुलदीप यादवला डच्चू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सूर्यकुमार यादवसह हार्दिक पांड्या, कुलदीप यादवलाही डच्चू
  • टी२० चे नेतृत्व करणार श्रेयस अय्यर 
  • समोर आले मोठे कारण 
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या गोष्टीची अटकळ समोर येत होती. अखेर या संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि श्रेयस अय्यरच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलेले नाही. सूर्यासोबतच, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनाही टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. अनेक चाहत्यांना यामुळे धक्काही बसला आहे. सोशल मीडियावर तर यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सूर्यकुमारला एक संधी मिळायला हवी होती असंही अनेकांना वाटत आहे. 

IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी

हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे की खराब फॉर्मबद्दल शिक्षा?

सूर्यासोबतच हार्दिक पांड्यालाही टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पांड्याला वगळण्यामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “हार्दिक एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक अजून १८ महिन्यांनी आहे, त्यामुळे टी-२० सामन्यांदरम्यान खेळाडूंना विश्रांती देण्याचा आणि रोटेशन धोरण अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हार्दिक संघाला उत्कृष्ट संतुलन देतो. जेव्हा तो पुन्हा गोलंदाजी सुरू करेल, तेव्हा आम्ही त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करू.”

आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवड समितीने हार्दिकला वगळण्यामागे रोटेशन धोरणाचे कारण दिले असले तरी, हार्दिकचा अलीकडील टी-२० फॉर्म अत्यंत निराशाजनक राहिला आहे हेही तितकेच खरे आहे. विशेषतः आयपीएल २०२६ मध्ये तो आपल्या कर्णधारपदाने आणि खेळाने छाप पाडण्यात अपयशी ठरला. हार्दिक सगळ्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक प्रकाशझोतात आलेला दिसून येत आहे. १९ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना हार्दिकने १० सामन्यांमध्ये केवळ २१० धावा केल्या आणि फक्त ४ बळी घेतले. दरम्यान आयपीएल मुंबई संघाची कर्णधारपदाची धुराही हार्दिककडून गेली आहे. 

IND vs AFG: 1 नव्या खेळाडूचे पदार्पण, ऋषभ पंत-ध्रुव जुरेल दोघांनाही संघात जागा; अफगाणिस्तानविरूद्ध भारताची Playing 11

कुलदीप यादवलाही टी-२० संघातून वगळले

केवळ हार्दिक आणि सूर्याच नाही, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही भारतीय टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी रवी बिश्नोईचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादवचीही अलीकडील टी-२० कामगिरी खराब राहिली आहे. शिवाय, आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना तो पूर्णपणे अपयशी ठरला. कुलदीपने यावेळी आपली छाप अजिबात सोडली नसल्यानेच त्याची निवड होऊ शकली नाही. 

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी टी२० संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी

Web Title: Hardik pandya kuldeep yadav out of t20 squads for england and ireland tours 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • indian cricket team
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.