Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Record: ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर ‘भीमपराक्रम’! केवळ १० धावा करत बनवला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

Rohit Sharma New Record: भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'लिस्ट ए' (List A) क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा गाठून इतिहास रचला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 03:29 PM
Rohit Sharma Record: ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर ‘भीमपराक्रम’! केवळ १० धावा करत बनवला ‘हा’ मोठा रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर ‘भीमपराक्रम’!
  • केवळ १० धावा करत बनवला ‘हा’ मोठा रेकॉर्ड
  • वाचा संपूर्ण बातमी…
IND vs AFG 2nd ODI: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना १७ जून रोजी लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित करण्यात आले. दरम्यान, भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘लिस्ट ए’ (List A) क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा गाठून इतिहास रचला. सामना सुरू होण्यापूर्वी त्याला या विक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ १० धावांची गरज होती मैदानावर उतरताच त्याने ही कामगिरी सहजपणे पूर्ण केली. केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच रोहितने आतापर्यंत ११,६४० धावा केल्या आहेत.

३५७ सामन्यांत ३७ शतके आणि ७४ अर्धशतके

रोहित शर्माची ‘लिस्ट ए’ क्रिकेटमधील एकूण आकडेवारी कोणत्याही फलंदाजासाठी स्वप्नवत अशीच आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ३५७ सामने खेळले असून, ३४५ डावांमध्ये ४६ पेक्षा जास्तच्या प्रभावी सरासरीने १४,०३८ धावा केल्या आहेत. या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासात त्याने ३७ शानदार शतके आणि ७४ अर्धशतके झळकावली आहेत, जे त्याच्या सातत्याची आणि मोठ्या खेळी साकारण्याच्या क्षमतेची साक्ष देतात.

IND VS AFG ODI 2026: ‘भारताविरूद्ध जिंकणं…’, दुसऱ्या ODI आधी अफगाणिस्तानचा कर्णधार ‘हे’ काय बोलून गेला

४८ धावांवर बाद; रशीद खानने घेतली विकेट

या ऐतिहासिक खेळीदरम्यान रोहित शर्मा अत्यंत आक्रमक अंदाजात फलंदाजी करत होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण करत त्याने ४८ धावांची वेगवान खेळी केली; यात सहा चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. मात्र, अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खान याच्या फिरकी चेंडूवर बाद झाल्यामुळे त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही.

प्रिन्स यादवचे एकदिवसीय पदार्पण

तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकली आणि खेळपट्टीचा अंदाज घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने आपल्या संघरचनेत काही बदल करून मैदानात पाऊल टाकले. अपेक्षेप्रमाणे, यशस्वी जयस्वालने रोहित शर्मासोबत सलामी दिली, तर नियमित कर्णधार शुभमन गिल या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. संघाची गोलंदाजी अधिक मजबूत करण्यासाठी रिस्ट-स्पिनर कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे, तसेच मध्यमगती गोलंदाज प्रिन्स यादवला आज भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

Rohit Sharma Record: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास! केवळ ‘इतक्या’ धावा करताच वीरेंद्र सहवागचा विक्रम मोडणार

Web Title: Hitman rohit sharma achieves a massive feat sets this major record by scoring just 10 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs AFG
  • Record
  • Rohit Sharma
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
2

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
3

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन
4

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.