फोटो सौजन्य - पॅरिस पॅरालिम्पिक
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस ऑलिम्पिकचा ११ ऑगस्ट रोजी समारोप समारंभ पार पडला. भारताने यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ६ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ कास्यपदकांचा समावेश आहे तर एक रौम्य पदकाचा समावेश आहे. यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता काही दिवसांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची सुरुवात होणार आहे. यामध्ये दिव्यांग खेळाडूची वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये स्पर्धा होत असते. काही दिवसातच भारताचे पॅरा खेळाडू पॅरिस खेळांसाठी रवाना होणार आहेत. भारताचे यंदा पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये भारताचे किती खेळाडू कोणत्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत यावर आपण एकदा नजर टाकणार आहोत.
हेदेखील वाचा – प्रो कबड्डी लीगचे खेळाडू झाले मालामाल! लिलावात हा खेळाडू सर्वात महाग
भारताचे एकूण ८४ पॅरा खेळाडू यंदा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जाणार आहेत. यामध्ये भारताचे ३८ पॅरा ॲथलेटिक्स सहभागी होणार आहे. तर १३ पॅरा बॅडमिंटन खेळाडू सुद्धा सहभागी होणार आहेत. शूटिंगमध्ये १० नेमबाजांची निवड करण्यात आली आहे. पॅरा आर्चरीमध्ये भारताचे ६ तिरंदाज सहभागी होणार आहेत. पॉवर लिफ्टिंगमध्ये ४ आणि कॅनिओमध्ये ३ खेळाडू सहभागी होणार आहेत. जुडो आणि पॅरा रोईंगमध्ये प्रत्येकी २-२ खेळाडू असणार आहेत. पॅरा टेबल टेनिसमध्ये २ आणि पॅरा ताईकांदो १ खेळाडू आहे. त्याचबरोबर पॅरा स्विमिंगमध्ये सुद्धा एक खेळाडू असणार आहे.
टोकियो पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने १९ पदकांची कमाई केली होती. यामध्ये ५ गोल्ड मेडल, ८ सिल्वर मेडल आणि ६ ब्रॉन्झ मेडलचा समावेश होता. तर आतापर्यत झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण १११ मेडलची कमाई केली आहे. यंदा भारताच्या पॅरा खेळाडूंकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे.