मुंबई : आज भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा आज ३६ वा वाढदिवस आहे. काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तान खेळाडू शोएब मलिक यांच्यात घटस्फोट होणार असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांच्या जवळच्या मित्रांनी देखील माध्यमांना सानिया शोएबचा घटस्फोट झाला असून दोघे वेगवेगळे राहत असल्याचे सांगितले. मात्र आज सानियाच्या वाढदिवशी शोएबने केलेल्या ट्वीमुळे आता या घटस्पोटाच्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे.
Happy Birthday to you @MirzaSania Wishing you a very healthy & happy life! Enjoy the day to the fullest… pic.twitter.com/ZdCGnDGLOT
— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) November 14, 2022
सानिया आणि शोएब या दोघांनी एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. आता त्यांना इझान नावाचा मुलगा आहे. मात्र सानिया आणि शोएब यांच्या लग्नावरून भारतात अनेक वाद निर्माण झाले होते. भारताची खेळाडू सानिया ही भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तान देशातील एका क्रिकेटपटूशी लग्न करणार असल्याने अनेकांनी या दोघांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. मात्र अखेर सर्वांचा विरोध डावलून सानिया आणि शोएबने एकमेकांशी लग्न केले.
घटस्पोटाच्या चर्चा जोरात सुरु असताना २ दिवसापूर्वी एका टॉक शो ची घोषणा करण्यात आली आहे. यात सानिया मिर्झा आणि तिचे पती शोएब हे दोघे शो वर येणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. याच शोच्या पब्लिसिटीसाठी सानिया आणि शोएबने घटस्पोटाचे कुंभाड रचल्याचं बोललं जात आहे. तसेच आता शोएब मालिकने सानियालासाठी पोस्ट केलेल्या ट्वीट मधून दोघांमध्ये सर्व काही आलवेल असल्याचे बोलले जात आहे.
सानिया मिर्झाला मिळालेले पुरस्कार :
२००३ ते २०१३ या कालावधीत सलग दशकभर तिने महिला टेनिस असोसिएशनच्या एकेरीत व दुहेरीत अव्वल भारतीय टेनिसपटू म्हणून आपले स्थान कायम राखले आणि त्यानंतर एकेरी स्पर्धेतून निवृत्ती घेतल्यानंतर अंकिता रैना यांनी स्थान मिळवले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या या खेळाडूला २००६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा मान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. २००६ साली अमेरिकेतील जागतिक टेनिस दिग्गजांमधील त्यांना डब्ल्यूटीएचा ‘मोस्ट इम्प्रेसप्रेसिव न्यू कमर अवॉर्ड’ देण्यात आला होता.