Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir: “भारतीय संघाचा कोच होण्यामागे KKR चा मोठा वाटा”; गौतम गंभीरने व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाला…

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 16, 2026 | 07:58 PM
"भारतीय संघाचा कोच होण्यामागे KKR चा मोठा वाटा"; गौतम गंभीरने व्यक्त केली कृतज्ञता (Photo Credit- X)

"भारतीय संघाचा कोच होण्यामागे KKR चा मोठा वाटा"; गौतम गंभीरने व्यक्त केली कृतज्ञता (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “भारतीय संघाचा कोच होण्यामागे KKR चा मोठा वाटा”
  • गौतम गंभीरने व्यक्त केली कृतज्ञता
  • म्हणाला…
Gautam Gambhir on KKR: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपल्या कारकिर्दीतील यशाचे गुपित उघड केले आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे. टी-20 विश्वचषक 2024 नंतर राहुल द्रविड यांच्याकडून सूत्रे हाती घेणाऱ्या गंभीर यांचा बीसीसीआयसोबतचा करार 2027 पर्यंत आहे.

केकेआरने मला ‘लीडर’ बनवले – गंभीर

गौतम गंभीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीवर केकेआरच्या प्रभावाबाबत सविस्तर भाष्य केले. गंभीर म्हणाला, “मी आज ज्या पदावर आहे, त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा खूप मोठा वाटा आहे. केकेआरने मला एक खंबीर नेता (Leader) म्हणून घडवले. माझ्यामध्ये आज जे नेतृत्वगुण दिसतात, ते केकेआरच्या कार्यसंस्कृतीमुळेच विकसित झाले आहेत.” केकेआरसोबतचा त्यांचा यशस्वी काळ हाच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी महत्त्वाचा निकष ठरल्याचेही त्याने यावेळी मान्य केले.

यशस्वी कर्णधार ते चॅम्पियन मेंटॉर

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि विशेष म्हणजे या तिन्ही विजयांमध्ये गौतम गंभीरचा प्रत्यक्ष सहभाग होता 2012 आणि 2014 गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली (कर्णधार) केकेआरने जेतेपद मिळवले.  गौतम गंभीर मेंटॉर म्हणून संघात परतला आणि शाहरुख खानच्या या फ्रेंचायझीने तिसऱ्यांदा करंडकावर नाव कोरले. या यशाने गंभीर यांची रणनीती आखण्याची क्षमता सिद्ध केली, ज्याचा फायदा त्यांना टीम इंडियाचे प्रशिक्षकपद मिळवण्यात झाला.

BAN vs PAK: “खरी सर्जरी तर आता…”; बांगलादेशविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर Shahid Afridi संतापला, PCB ला सुनावले खडेबोल

प्रशिक्षक म्हणून दोन आयसीसी जेतेपदांचा विक्रम

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने यशाची शिखरे सर केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नुकताच पार पडलेला 2026 चा टी-20 विश्वचषक अशा दोन सलग आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकल्या आहेत. एकाच प्रशिक्षकाच्या काळात दोन आयसीसी जेतेपदे मिळवणारे गंभीर हा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे.

2027 च्या विश्वचषकाकडे लक्ष

गौतम गंभीर यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. सलग दोन जागतिक विजेतेपदानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष 2027 च्या विश्वचषकाकडे लागले आहे. गंभीरच्या रणनीतीमुळे भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होणार का, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.

एक मोठी भविष्यवाणी! मोहम्मद शमीला IPL 2026 मध्ये मिळणार कमबॅक करण्याची संधी? दिग्गज खेळाडूने केला दावा

Web Title: I became team indias head coach solely because of kkr gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • KKR
  • Team India
  • Team India head coach

संबंधित बातम्या

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
1

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
2

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.