Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी

ICC Awards : शुभमन गिल आणि शेफाली वर्मा यांना आयसीसीच्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हे तिसऱ्यांदा घडले जेव्हा भारताच्या दोन खेळाडूंनी एकत्रितपणे हा पुरस्कार पटकावला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 02:02 PM
ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ'चे मानकरी

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ'चे मानकरी

Follow Us
Follow Us:
  • गिलला पाचव्यांदा पुरस्काराचा मान
  • शेफालीने दुसऱ्यांदा पटकवला पुरस्कार
  • गिलने मानले पॅनलचे आभार
भारतीय वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि महिला क्रिकेट संघाची सलामी फलंदाज शेफाली वर्माला आयसीसीच्या सप्टेंबर महिन्यातील पुरुष आणि महिलांच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट क्रिकेटर (ICC Awards) म्हणून निवड करण्यात आली आहे. हे तिसऱ्यांदा घडले, जेव्हा भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटर्सला एकत्रितपणे महिन्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या रुपात निवडण्यात आले.

गिलने वेस्ट इंडिजविरोधात वनडे मालिकेत शानदार कामगिरीनंतर सप्टेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. गिलने पाचव्यांदा हा सन्मान प्राप्त केला आहे. त्याने पुरुष गटात सर्वात जास्त वेळा हा पुरस्कार जिंकत आपला रेकॉर्ड पुढे नेला आहे.

शेफालीला दुसऱ्यांदा पुरस्कार

शेफाली वर्माने महिला आशिया चषक आणि एशियन गेम्समध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर दुसऱ्यांदा महिन्यातीलव सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे.

गिलला मिळालेल्या या नव्या पुरस्काराने वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजसोबतच्या रांगेत उभं केलं आहे. मॅथ्यूजने देखील पाच वेळा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातक 110 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात 133 चेंडूंत शानदार 223 धावांची खेळी केली.

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!

गिलने पॅनलचे आभार मानले

पुरस्कार जिंकल्यानंतर गिल म्हणाला की, आपल्या पाचव्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकत खूप छान वाटत आहे. मी या सन्मानासाठी पॅनलचे आभार मानतो. एवढ्या धावा करणं खूप छान वाटत आहे आणि आपल्या घरच्या चाहत्यांसमोर यशस्वीपणे धावांचा पाठलाग करण्यासाठी हे खूप खास ठरले आहे.
तो पुढे म्हणाला की, वनडे क्रिकेटमध्ये गती खूप वाढली आहे. आपल्याला तातडीने विचार करावा लागतो. परिस्थितीचा लगेच अंदाज बांधावा लागतो. खेळपट्टी आणि लक्ष्याच्या गरजेनुसार स्वतःवर नियंत्रण राखावे लागते.

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपसोबतच आम्ही आपल्या पातळीला सर्वोत्तम करत राहणार आहोत. पुढील येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम एक बळकट आणि संतुलित टिम बनवण्यासाठी ते दृढ आहे.

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

शेफाली वर्मा म्हणाली की, आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड पुन्हा जिंकण एक अविश्वसनीय सन्मान आहे. आशिया चषक आणि एशियन गेम्समध्ये जिंकण्यासाठी एक भूमिका बजावणे चांगले राहिले आणि हा पुरस्कार जिंकल्यामुळे ते विजय आणखीन खास झालेत.

ती पुढे म्हणाली की, मी येणाऱ्या महिन्यांसाठी खूप उत्साहित आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी विमन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली चांगली कामगिरी कायम राखण्याचा पक्का इरादा आहे. या स्पर्धेची मी आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वचषक जिंकण्याच्या आठवणी अद्याप ताज्या व खास आहेत. मी आपल्या खेळपट्टीवर आयसीसी स्पर्धेसाठी मैदानात पुनरागमन करण्याची वाट पाहू शकत नाही.

सप्टेंबरच्या शॉर्टलिस्टमध्ये पुरुषांच्या कॅटेगरीत गिलशिवाय भारताचा ओपनर अभिषेक शर्मा आणि झिम्बॉब्वेचा कर्णधार सिकंदर शर्माला नॉमिनेट करण्यात आले होते, तर महिलांमध्ये शेफालीशिवाय श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापटू आणि भारताची लेफ्ट आर्म स्पिनर श्री चरणीला देखील नामांकित करण्यात आले होते.

Web Title: Icc awards shubman gill shafali verma player of the month september rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • ICC
  • Shefali Verma
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

ICC vs US Conflict : ‘आयसीसीने धमक्या देणे थांबवावे, नाहीतर आम्ही…’, निर्बंध लादून ट्रम्प प्रशासनाने काय म्हटले?
1

ICC vs US Conflict : ‘आयसीसीने धमक्या देणे थांबवावे, नाहीतर आम्ही…’, निर्बंध लादून ट्रम्प प्रशासनाने काय म्हटले?

चाहत्यांनो जरा सांभाळून…! कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती होणार? ICC थेट WTC च्या फॉर्मटमध्ये ‘हा’…
2

चाहत्यांनो जरा सांभाळून…! कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती होणार? ICC थेट WTC च्या फॉर्मटमध्ये ‘हा’…

ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट
3

ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.