
पैसाच पैसा! आयसीसीची विजेत्या Australia संघावर आर्थिक खैरात; उपविजेत्या इंग्लंडला किती कोटींचे बक्षीस?
लंडनच्या लॉर्डस क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना पार पडला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंडच्या संघाचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सातव्यांदा विश्वविजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 150 रन्स करत ऑस्ट्रेलियाला 151 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र ऑस्ट्रेलिया संघाने 3 विकेट्स गमावून ही लक्ष्य सहज पूर्ण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 7 वेळेस वर्ल्डकप जिंकला आहे.
आयसीसीने यंदा टी 20 वर्ल्डकपच्या बक्षिसाच्या रकमेत 10 टक्क्यांची वाढ केली आहे. यंदा आयसीसीने एकूण रक्कम ८७,६४,६१५ डॉलर्स म्हणजेच सुमारे 73 कोटी इतकी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता झाला आहे. त्यामुळे या संघाला बक्षीस म्हणून २३,४०,००० डॉलर्स म्हणजेच अंदाजे 19.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे आयसीसीने यंदा विजतेयाय आणि उपविजेत्या संघावर बक्षिसाचा वर्षाव केला आहे.
Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास
इंग्लंडचा संघ उपविजेता ठरला आहे, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव करत वर्ल्डकप जिंकला आहे. पविजेत्या इंग्लंड संघाला आयसीसीकडून मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर दुसरीकडे, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ साखळी फेरीतच बाद झाला असला, तरी टीम इंडियाने या स्पर्धेतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. अंतिम सामन्यात उपविजेत्या ठरलेल्या इंग्लंडच्या महिला संघाला ११,७०,००० डॉलर्स म्हणजेच 11 कोटींच्या आसपास बक्षीस मिळाले आहे. तसेच आयसीसीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना देखील सुमारे 2. 34 कोटी रुपये बक्षीस जाहीर केले आहे.