Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK VS SL: पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेचा मोठा डाव! थेट कर्णधारच टाकला बदलून, आता ‘हा’ खेळाडू….

PAK VS SL: कसोटी कर्णधार म्हणून कुसल मेंडिसची ही पहिलीच सिरिज असणार आहे. धनंजय डी सिल्व्हाने अचानक कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, निवडकर्त्यांनी अनुभवी मेंडिसवर विश्वास दाखवला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 06:24 PM
pakistan vs sri lanka test series

pakistan vs sri lanka test series

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरिजसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
  • कुशल मेंडीस बनला श्रीलंकेचा नवा कर्णधार 
  • 9 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणार टेस्ट सिरिज 
SL Vs PAK/ Test Series: लवकरच पाकिस्तान क्रिकेट संघ आणि श्रीलंकेचा संघ टेस्ट सिरिज कहळणार आहेत. श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ 2 सामन्यांची टेस्ट सिरिज खेळणार आहे. दरम्यान या सिरिजसाठी श्रीलंकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. कुशल मेंडिस श्रीलंकेचा नवा कर्णधार असणार आहे. नुकतेच धनंजय डी सिल्व्हा याने कर्णधारपद सोडल्यानंतर, अनुभवी फलंदाज कुसल मेंडिस याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

कसोटी कर्णधार म्हणून कुसल मेंडिसची ही पहिलीच सिरिज असणार आहे. धनंजय डी सिल्व्हाने अचानक कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, निवडकर्त्यांनी अनुभवी मेंडिसवर विश्वास दाखवला आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या निवडकर्त्यांनी संघात अनेक मोठे बदल केले असून, काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.

🇱🇰 SQUAD ANNOUNCEMENT | Sri Lanka Tour of Pakistan 🇵🇰 Here is your 15-member Sri Lanka Test Squad for the upcoming 2-match Test series against Pakistan! 🏏 #PAKvSL https://t.co/vEE90nI0rz — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 13, 2026

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सिरिजसाठी श्रीलंकेने तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी देऊन त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ दिले आहे. खराब फॉर्म आणि तंदुरुस्तीच्या कारणांमुळे काही अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. तर दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तसेच काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे.

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतर्गत खेळवली जाणारी ही सिरिज ९ नोव्हेंबरपासून रावळपिंडी येथे सुरू होणार आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात श्रीलंकेचा संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानविरुद्धची ही दोन कसोटी सामन्यांची मालिका ‘आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही म्हणजेच पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

श्रीलंका संघ: कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका (फिटनेस मंजुरीवर आधारित), पसिंदु सोरियाबंदारा, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, धनंजय डी सिल्वा, अंजाला बंदारा (यष्टिरक्षक), सोनल दिनुषा, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायके, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, ईशान मलिंगा

Web Title: Kushal mendis as new captain of sri lanka play test series against pakistan in rawalpindi tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • PAK vs SL
  • Pakistan cricket
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

Kusal Mendis: श्रीलंकेचा नवा टेस्ट कर्णधार ठरला! कुसल मेंडिसच्या हाती संघाची कमान; बोर्डाचा मोठा निर्णय
1

Kusal Mendis: श्रीलंकेचा नवा टेस्ट कर्णधार ठरला! कुसल मेंडिसच्या हाती संघाची कमान; बोर्डाचा मोठा निर्णय

Dhananjaya De Silva Resigns: धनंजय डी सिल्वाच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वात खळबळ; काय आहे कारण?
2

Dhananjaya De Silva Resigns: धनंजय डी सिल्वाच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वात खळबळ; काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.